💥लेडी सिंघम नैना पोहेकर यांची अवैध दारू अड्ड्या विरोधात धाडसी कारवाई...!

 


💥पाच किलोमीटर पाई जंगलात जाऊन गावठी दारूअड्डा केला ऊध्वस्त💥

वाशिम:-दि.२७ डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन अनसींग अंतर्गत मा. पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांच्या आदेशा प्रमाणे तसेच ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी कारवाईसाठी विषेश पथक तयार करुन  ग्राम कृष्णा  येथुन अंदाजे पाच km अंतरावर अनसिंग पो.स्टे.च्या लेडी सिंघम ठाणेदार नैना पोहेकर यांनी शेतशिवारात पैदल स्टाॕफ् सह जाऊन शालिक सोमला राठोड ह्याचे शेतात नालेजवळ गावठी हाथभट्टी साहित्य  आणी दोन ड्रम प्रत्येकी  100 लीटर प्रमाने 200 लिटर  गुळ असलेला मोहामाच सडवा सर्व साहित्या सह किंमत 20760/रुपयेचा पंचासमक्ष नाश केला.


त्यानंतर ग्राम उकळी पासुन सहा ते सात  km पैदल जाऊन आरोपी नावे भाष्कर संपत इंगोले ह्याच्या शेतात विहिरीजवळ गावढी दारु हातभट्टी चालू असताना, पोलिसांना पाहुन आरोपी पळुन गेला.सदर ठिकाणी चार ड्रम पैकी दोन ड्रम प्लास्टिक चे व दोन ड्रम लोखंडी ह्यामधे गावठी मोहामाच सडवा  अंदाजे 600 लिटर व कॕन मधे 20 लिटर दारु व ईतर साहीत्य असे   62450/रुपयाचा माल जप्त मोहामाच जागेवरच पंचासमक्ष नाश केला.संबंधित  दोन्ही आरोपीतावर दारुबःदी आधिनियमानूसार कारवाई करण्यात आली.सदर कारवाई ठाणेदार नैना पोहेकर यांचेसोबत Hc शेषराव राठोड npc औंकार चव्हाण  npc विनोद चित्तकवार, pc मधुकर देसाई  pc सराळ pc सचीन गडदे आदी हजर होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या