💥पुर्णा तालुक्याती एरंडेश्वर येथे शिवनाम सप्ताह प्रारंभ.....!


💥मह़ंत शिवानंद भारती महाराज यांच्या उपस्थिती मध्ये शिवनाम सप्ताह प्रारंभ💥 

पुर्णा (दि.२० डिसेंबर) - तालुक्यातील एरंडेश्वर येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आज सोमवार दि.२० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०७-०० वाजता मह़ंत शिवानंद भारती महाराज यांच्या उपस्थिती मध्ये शिवनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे. 


   
दैनंदिन कार्यक्रम सकाळी ०५-०० ते ०६-०० शिवपाठ ०७-०० ते ०८-०० शिवलींगास रुद्राभिषेक व शिव सहस्त्रनामावली ०८-०० ते ०८-३० शिव नामाचा गजर ०८-३० ते ११-३० ग्रंथराज परमरहस्य पारायण ११-३० ते १२-३० वाजता प्रवचन व आरती दुपारी ०३-०० ते ०४-०० प्रवचन ०४-०० ते ०५-०० गाथा भजन ०५-०० ते ०७-०० शिव पाठ करा शिव कीर्तन व नंतर शिवजागर होईल. प्रवचन व किर्तन आज सोमवार २० डिसेंबर रोजी प्रवचन शिभप.अरूणाबाई शिंदे एरंडेश्वर कर किर्तनकार शिभप.नागेश स्वामी महाराज कुरुंदवाडी उद्या मंगळवार दि.२१ डिसेंबर रोजी प्रवचनकार शिभप.मारोती महाराज शिंदे,किर्तनकार राजू स्वामी महाराज जामगव्हाण बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रवचनकार शिभप. सदाशिव आप्पा पिंपरणकर परभणी किर्तनकार सोनबा आप्पा शिराळे गुरुजी वसमत गुरूवार दि.२३ डिसेंबर रोजी प्रवचनकार  शिभ‌प.कैलासआप्पा येरगे महाराज वसमत किर्तनकार मन्मथ आप्पा खके गुरुजी चारठाणकर शुक्रवार दि.२४ डिसेंबर रोजी प्रवचनकार शिभप.विश्वंभर आप्पा साखरे परळी वैजनाथ,किर्तनकार मोहन महाराज कावडे हासनाळीकर शनिवार दि.२५ डिसेंबर रोजी प्रवचनकार अमोल देवडे गुरुजी साडेगावकर,किर्तनकार शिवचरण गुरुजी रटकळकर रविवार दि.२६ डिसेंबर रोजी श्री.108 डॉ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा यांचे अमृतोपदेश व दुपारी ०३-०० वाजता श्री.शिभप.मारोती शिंदे. एरंडेश्वरकर यांचे टाळ व आरती वरील कीर्तन होईल. किर्तनकार शिभप.संगमेश्वर बिराजदार महाराज सोमवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ०९-०० ते ११-०० श्रीच्या प्रतिमेची व ग्रंथराज परमरहस्ययाची  एरंडेश्वर येथील गावच्या मुख्य  रस्त्यावररून मिरवणूक होईल तसेच सकाळी ११-०० वाजता श्री.शिभप.संगमेश्वर बिराजदार महाराज वलाडीकर यांचे प्रासादिक कीर्तन व दुपारी एक वाजता श्री‌.ष.ब्र‌.१०८ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी यांचे अमृतोवपदेश व नंतर महाप्रसाद होईल या कार्यक्रमाच्या पुजाविधी श्री सोमनाथ स्वामी एरंडेश्वरकर,श्री ओमकार स्वामी यांच्या हस्ते  संपन्न होणार आहे .या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विरशैव  मंडळ व एरंडेश्वर येथील ग्रामस्थांनी केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या