💥नंदागौळ गावांतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ....!


💥येत्या काळात संपुर्ण नंदागौळ गावात नव्याने दर्जेदार सिमेंट रस्ते करणार - सुंदर गित्ते

परळी (प्रतींनिधी) - परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून गावचे युवक नेते तथा सरपंच सुंदर गित्ते यांनी अवघ्या ४ वर्षात संपूर्ण गावचा कायापालट केला असून,त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून 2515 योजने अंतर्गत मंजुर केलेल्या नंदागौळ येथील हनुमान मंदिर परिसर,हनुमान मंदिर ते मधली चावडी ते विस्तारीत जिल्हा परिषद शाळा या ठिकाणच्या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ युवकनेते सुंदर गित्ते व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सध्या सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम हे अत्यंत दर्जेदार होत असून हे रस्ते अनेक वर्षे टिकले पाहिजेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करण्यात येत आहे,हे रस्त्याचे काम पाहून गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून आजपर्यंत गावात केलेले रस्ते व आज काम सुरू केलेला रस्ता यात खूप मोठा फरक दिसल्याने सुंदरभाऊच्या कार्याचे कौतुक रस्ता पाहणारे नागरिक करत आहेत.यावेळी बोलताना सुंदर गित्ते म्हणाले की येत्या काळात संपूर्ण नंदागौळ गावात नव्याने दर्जेदार सिमेंट रस्ते करून गावचा चेहरा मोहरा बदलून टाकून गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणार आहे.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या