💥परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक...!


💥वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णु पंडितराव मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल💥

परळी ; तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायत एका सदस्याने राजीनामा दिल्या कारणाने एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे.२८ नोहेंबर २०२१ ते ०५ डिसेंबर २०२१ फॉर्म भरणे,०७ डिसेंबर छाननी,०८ डिसेंबर माघार व चिन्ह वाटप,२१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून २२ डिसेंबर २०२१ ला मतमोजणी आहे.

दरम्यान ०३ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विष्णु पंडितराव मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, तालुका अध्यक्ष गफार शा, शहराध्यक्ष संजय गवळी, माजी तालुकाध्यक्ष गौतम साळवे, युवा तालुका अध्यक्ष साहेबराव रोडे, युवा नेते राजेश सरवदे, अविनाश मुंडे, सुभाष रोडे, अनुरथ काजले, सुशील मुंडे, सचिन मुंडे, अमित सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या