💥पुर्णेत लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन....!


💥लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या सारखा नेता पुन्हा होणार नाही त्यांची आठवण सदैव स्मरणार्थ राहिल - ॲड.जि.एन.डाखोरे

पुर्णा ; देशाचे पुर्व केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आज रविवार दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी येथील आनंद नगर परिसरात त्यांना अभिनंदन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ ॲड.घनश्याम डाखोरे यांनी स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना नेते छगन अप्पा मोरे, जेष्ठ नेते नवनाथ मामा वाघमारे, जेष्ठ व्यापारी पारवे जेष्ठ व्यापारी गणेशराव सूर्यवंशी, दत्तराव लिंगायत,विनय कराड,मनसे शहराध्यक्ष युवा नेते गोविंद ठाकर,सचिन असोरे,निलेश नागठाणे आदींची उपस्थिती होती.


यावेळी बोलतांना जेष्ठ विधीतज्ञ ॲड.डाखोरे म्हणाले की स्व.गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या सारखा लोकहीतवादी लोकनेता पुन्हा होणार नाही सर्वसामान्य जनतेसाठी सदैव लढा देणारे मुंडे साहेब सदैव स्मरणात राहती असेही ॲड डाखोरे पाटील म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या