💥राजकीय लबाड लांडगा बघा सोंग करतोय : शहरातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास केल्याचे ढोंग करतोय....!


💥पुर्णा शहरातील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराच्या बांधकामाचे लेखी आश्वासन सुध्दा ठरले लबाडाचे औतान💥

पुर्णा ; संधीसाधू राजकारणी राजकारण करीत असतांना सर्व समाजासह सर्व धर्मियांना सोबत घेऊन विकासाच्या भुलथापा तर देतात परंतु प्रत्यक्षात मात्र भेदभावाचा अवलंब करून आपल्या संकुचित भावनेचा परिचय जनसामान्यांना करून देत असतात यात पुर्णा नगर परिषदेला स्वतःच्या बापाची मक्तेदारी समजून विकासाच्या नावावर शासकीय विकासनिधी कागदोपत्री ओरबडून कसा खाता येईल याचे ज्ञान प्राप्त झालेल्या राजकीय लबाडांनी शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील नागरिकांची शुध्द फसवणूक केल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


शहरातील साठे नगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर मोडकळीस आले असून सदरील समाज मंदिराचे नव्याने बांधकाम अर्थात नुतनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील महिण्यात २० आक्टोंबर २०२१ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते राम रुपचंद जोनवाल व रवी बाबूराव गायकवाड हे नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसले होते यावेळी पुर्णा नगर परिषद प्रशासनाने संबंधित उपोषणार्थींना तात्काळ उपोषण उठवण्याची विनंती करीत २० आक्टोंबर २०२१ रोजी जा.क्र./नपपु-२/४१०५/२०२१ अनुसार लेखी स्वरूपात आश्वासन देऊन येणाऱ्या १५ दिवसात साठे नगर परिसरातील मोडकळीस आलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर पाडून नवीन बांधकामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु नगर परिषद प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन निव्वळ 'लबाडाचे आवतान' ठरले असून "राजकीय लबाड लांडगा बघा सोंग करतोय : शहरातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास करण्याचे ढोंग करतोय" असे म्हणण्याची वेळ मातंग समाज बांधवांवर आली असून दिलेल्या आश्वासनाची अद्यापही पुर्तता झाली नसून नगर परिषद निवडणूक पुर्व आचार संहिता लागण्याला अवघे काही दिवसच बाकी असतांना अद्यापही व नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाला आज सोमवार दि.२० डिसेंबर २०२१ रोजी दोन महिण्यांचा कालावधी झाला असतांना ही अद्याप पर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची एक विट सुध्दा इकडची तिकडे झाली नसल्यामुळे मातंग समाजात तिव्र असंतोष निर्माण झाला असून आज सोमवार दि.२० डिसेंबर २०२१ रोजी याच मागणीसाठी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते राम रुपचंद जोनवाल व रवि बाबुराव गायकवाड हे नगर परिषदे समोर आमरण उपोषणाला बसले आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या