💥राज्य समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन....!


💥शहरातील बी.रघुनाथ सभागृहात राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू💥

परभणी (दि.१७ डिसेंबर) - राज्य समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरिता आज शुक्रवार दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक कामबंद आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जिल्हा परभणी यांच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू  करण्यात आल्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , बैठक संपल्यावर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आँचल गोयल यांना मागण्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले .त्याद्वारे समुदाय अधिकारी यांना नियमित मासिक वेतन वेळेवर देण्यात यावे , समुदाय अधिकारी हे उपकेंद्राचे प्रमुख असून त्या बाबत त्यांना उपकेंद्र वरील अधिकार देण्यात यावे तसे पत्र तात्काळ काढण्यात यावे ,कोविड लसीकरणाच सुद्धा काम समुदाय आरोग्य अधिकारी करत आहेत ,नेमके कुठं काम प्राधान्याने करावे , या विषयी स्पष्ट उल्लेख असणारे पत्र काढण्यात यावे , इंटरनेट वापरा साठी मासिक 200 रुपये भत्ता देण्यात यावा , कोविड 19 लसीकरणातील डाटा एन्ट्री चा कामाचा अतिरिक्त भत्ता देण्यात यावा अश्या विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून आज कामबंद आंदोलन करण्यात आले आहे निवेदनावर सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या