💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन...!


💥धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड करु नये,कराचीतील जोगमाया मंदीर घटनेवर पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाचा संताप💥

 ✍️ मोहन चौकेकर

●मोठी बातमी..! ओमायक्रॉन विरुद्ध लढा सुरु; नाईट कर्फ्यूपासून ते उत्सवांवर बंदी.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना सुचना

● राज्यातील महिलांना मिळणार आता सुरक्षाकवच! विधानसभेत 'शक्ती कायदा' एकमतानं मंजूर.

● नाईट लॉकडाऊनचा वरिष्ठ पातळीवर विचार सुरु; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वाची माहिती.

● मुंबई महापालिकेच्या भांडूपमधील सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसुतीगृहात  चार बालकांचा मृत्यू, विधानसभेत गदारोळ; विरोधकांच्या संतापानंतर सरकारची मोठी घोषणा.

➖➖➖

*🥇 Gold-Silver Price*

*सोने -* 48,300 रुपये प्रति 10 ग्रॅम.

*चांदी -* 62,300 रुपये प्रति किलो.

➖➖➖

● सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात; वीजबिलाच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधानपरिषदेतून सभात्याग.

● पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकी, धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक; आरोपीच्या कर्नाटक कनेक्शनवरुन सत्ताधारी आक्रमक.

● राज्यात गुरूवारीआज दिवसभरात 23 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद तर 1179 नव्या कोरोनाबाधितांची भर; आज 615 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 17 रुग्णांचा झाला मृत्यू.

● दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

➖➖➖

*📊 Share Market :*

*सेन्सेक्स -* 57,315.28 (+384.72)

*निफ्टी -* 17,072.60 (+117.15)

➖➖➖

● वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीजपुरवठा खंडित; मराठवाड्यातील 1254  शाळांकडे 3.47 कोटी रुपयांची रक्कम थकीत.

● नव्या प्रभाग संख्येनुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू, अडथळा आल्यास प्रक्रिया विस्कळीत होईल; निवडणूक आयोगाचं हायकोर्टात प्रतिपादन.

● धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड करु नये, कराचीतील जोगमाया मंदीर घटनेवर पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाचा संताप.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या