💥शाळेसाठीची कोवीड नियमावली चे काटेकोर पालन करा अन्यथा प्राथमिक व माध्यमिक शाळा तात्काळ बंद करा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.३० डिसेंबर) - काल परभणी शहरातील एका खाजगी शाळेमध्ये कोवोड पॉझिटिव्ह विद्यार्थी सापडला यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये कमालीची दशहत पसरली आहे . या अगोदरही ग्रामीण भागात काही शाळकरी विद्यार्थी कोवीड पॉझिटिक सापडले आहेत . शहरामध्ये कोविड तपासणीची व्यवस्था आहे परंतू ग्रामीण भागामध्ये या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. त्याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्हयातील शाळांना घालून दिलेले कोरोनाचे निर्बंध व नियमावली जिल्हयातील खाजगी व शासकीय शाळांमध्ये राबवल्याच जात नाही. अनेक शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना मास्क वापरणे सक्तीचे केलेले नाही शिवाय कोठल्याही प्रकारचे सॅनेटायझर फवारनी केली जात नाही शिवाय शाळेत सॅनेटायझर दिले जात. जिल्हयातील जवळपास सर्वच शाळा कोविड नियमावलीचे पालन न करता सुरु असुन वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरशः कोंबले जात आहेत. या शाळा भविष्यामध्ये कोविड संक्रमणाचे केंद्र ठरू शकतात व त्याचा स्फोट होऊ शकतो. कोवीड नियमावलीचे पालन न करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे लसीकरण झालेले नाही असे असतानाही अशा विद्यार्थ्यांना एकत्र आणने कोवीड संक्रमणाला निमंत्रण ठरु शकते.


करिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळाना कोविड नियमावली चे कडक पालन करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा कोवीड संक्रमणाचा धोका टळेपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा बंद ठेवाव्यात या मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, मीडिया प्रभारी नकुल होगे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, वैभव संघई इत्यादींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या