💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी उपतालुका प्रमुखपदी ज्ञानेश्वर पूंजारे यांची नियुक्ती....!


💥त्यांच्या कडे झरी व बोबडे टाकली जिल्हा परिषद सर्कलची जबाबदारी असणार आहे💥

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा व परभणी तालुका कार्यकारणी ची बैठक जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात पार पडली यात आगामी महानगर पालिका,पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका व संघटन बांधणी संदर्भात चर्चा झाली.याच बैठकीत परभणी तालुक्यासाठी उपतालुका प्रमुखपदी ज्ञानेश्वर पूंजारे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या कडे झरी व बोबडे टाकली जिल्हा परिषद सर्कलची जबाबदारी असणार आहे.

ज्ञानेश्वर पूंजारे यांना त्यांच्या नियुक्ती चे पत्र जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते देण्यात आले, त्यांच्या या निवडी मुळे झरी व बोबडे टाकळी जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे काम ताकतीने वाढेल व गोरगरीब जनतेला, शेतकरी व शेतमजूर, निराधार व अपंग अनाथांना न्याय मिळेल व मा.ना. बच्चुभाऊ कडू यांचे कार्य जनसामान्यांना पर्यंत पोहचेल व ग्रामीण भागातील गरजवंताना न्याय मिळेल असे मत या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी व्यक्त केले.

पुंजारे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, मिडिया प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, दत्तराव रोंदळे, धर्मेंद्र तूपसमिंद्रे, वैभव संघई इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या