💥भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते अभिषेक पवार यांची भारतीय 'अ' संघात निवडीबद्दल सत्कार.....!


💥बीड जिल्ह्यातून निवड होणारा पहिला खेळाडु अभिषेक ठरल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे💥

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते परळी येथील युवा क्रिकेटर अभिषेक पवार याची भारतीय अ संघात निवडीबद्दल परळीत सत्कार करण्यात आला आहे. अभिषेक याचे क्रिकेटमधील करिअर घडविण्यासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करुन प्रोत्साहन दिले आहे.भारतिय अ संघात बीड जिल्ह्यातून निवड होणारा पहिला खेळाडु अभिषेक ठरल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

         नेपाळ मधील पोखरा येथे होणाऱ्या इंडो-नेपाळ टी-२० क्रिकेट चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी परळी तालुक्याचे सुपूत्र अभिषेक विजयकुमार पवार याची भारतीय अ संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटाबांधून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  १८ जानेवारी २०२२ ते २० जानेवारी २०२२ दरम्यान नेपाळ येथे या स्पर्धा होणार आहेत. अभिषेक पवार हा परळी तालुक्यातील न्यु हायस्कुल, थर्मल कॉलनी, परळी वै. या शाळेत इयत्ता नववी वर्गात शिकत आहे. टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने त्याला उपरोक्त संघात निवड झाल्याचे लेखी पत्र पाठविले आहे. यापुर्वी त्याने ऑल इंडिया टी-२० चॅम्पीयन टॉफी गोवा या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगीरी केली होती. त्यामुळे त्याची आता भारतीय अ संघात निवड झाली आहे. त्याने आपल्या क्रिकेटची सुरूवात सतिश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १२व्या वर्षापासून केली होती. भारतीय अ संघात टी-२० क्रिकेट साठी निवड झालेला अभिषेक हा त्याच्या वयोगटातील बीड जिल्ह्याचा पहिलाच खेळाडू आहे. संघात निवड झाल्याचे पत्र टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी अक्षय पराशर यांनी पाठविले आहे. अभिषेक हा परळी तालुक्यातील धारावती तांडा येथील शेतकरी कुटूंबातील असून वडील विजयकुमार पवार हे शेती करतात व आई उषा या घरकाम व आजी मधुबाई व आजोबा बाबुराव यांची सेवा करतात. त्याच्या दोन बहिणी अकांक्षा व अलका या शालेय शिक्षण घेत असून मामा अमोल व गणेश हे जॉब करतात असा हा अभिषेकचा परिवार आहे. अभिषेक याचे वडील विजयकुमार पवार यांना भाजपा जिल्हाध्यक्ष निळुभाऊ चाटे यांनी अभिषेकला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहीत करून गरज पडेल तिथे आर्थिक मदतीचा हातभार लावत असतात. तसेच बंजारा सामाजाचे युवा नेतृत्व बालासाहेब (पप्पू) चव्हाण यांचे महत्वाचे योगदान आहे. अभिषेक पवार यांची भारतीय अ संघात निवड झाल्यामुळे त्यांचे बंजारा समाज व सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या