💥राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना समान पातळीवर आणले - प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते💥

नांदेड (दि.६ डिसेंबर) : भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना समान पातळीवर आणले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ. प्रदीप बिरादार, डॉ. पंडित चव्हाण आणि अ.भा.वि.प.चे गणेश हत्ते हे उपस्थित होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व विशद करताना प्राचार्य घुंगरवार म्हणाले की, 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या भारतीय राज्यघटनेद्वारे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या तरतुदींच्या माध्यमातून तमाम भारतीयांना '"एक व्यक्ती, एक मत, एक किंमत" या दृष्टिकोनातून सर्वांना राजकीयदृष्ट्या समान बनविले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. साहेबराव शिंदे यांनी तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नागेश कांबळे यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या