💥नवीन वर्षाचे स्वागत ; नो दारू नो बियर हॅपी न्यु इयर - अंधश्रध्दा निर्मुलन समिती


💥अंनिसच्या वतीने चला व्यसनाला बदनाम करूयाची घोषणा...हा पंधरवाडा व्यसन मुक्ती म्हणून साजरा करणार💥

पूर्णा (दि.३० डिसेंबर) - नविन वर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबर या दिवशी रात्री उत्साहाच्या भरात व्यसन करून साजरा केले जाते त्यामुळे नव तरुण व्यसनाच्या जाळ्यात अडकल्या जात आहे त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चला व्यसनाला बदनाम करूया या पंधरवाडा व्यसन मुक्ती म्हणून साजरा करण्याचे आयोजन करण्यात येत आहे -द दारू च्या ऐवजी द दुधाच हा शब्द प्रयोग करून दारू ऐवजी दुध प्राशन करावे त्यामुळे शरीराला पोशख निर्माण होते दारू प्राशन केल्याने शरीराला घातक निर्माण होते त्यामुळे नविन वर्षाचे स्वागत मिठाई वाटप करून एकमेकाना शुभेच्छा घाण्यात भेटी गाठी द्याव्यात असे आवाहन महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पूर्णा शाखा अध्यक्ष डॉ. डी.आर वाघमारे कार्यध्यक्ष डॉ. दिलीप शृंगार पुतळे ' अशोक एंगडे गणेश पाटील प्रा पर्लेकर शेख नशीर अमृत कऱ्हाळे गिरीष कदम राजेंद्र कमळू सुनिल कऱ्हाळे प्रसेनजीत ढगे अमन जोधळे शिवप्रसाद ठाकूर आदि कार्यकर्ता च्या वतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या