💥परभणी शहर महानगरपालिकेने कोवीड संक्रमण काळात खरेदी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्यांची चौकशी करा...!


💥चौकशीसह दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागणी💥


परभणी - कोवीड - १९ च्या पहिल्या व दुसन्या लाटेमध्ये परभणी शहरातील कोवीड संक्रमीत व संशयीत नागरीकांच्या विलगीकरणासाठी तसेच उपचारासाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने विलगीकरण कक्ष व तात्पुरत्या उपचाराची सोय करण्यासाठी शहरात विविध भागात केंद्र स्थापन करण्यात आली होती व यासाठी मोठ्या प्रमाणावर खाटांची व मेट्रेसची खरेदी केली होती परंतु ही खरेदी निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यावेळी खरेदी केलेल्या साहित्याची सद्य परिस्थिती पाहता सिध्द होत आहे करिता या कोविड काळात परभणी शहर महानगर पालिकेने केलेल्या खरेदी साहित्याची गुणवत्ता तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या साहित्य खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल गोयल मॅडम, जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.


 मागील वर्षी करोडो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या खाटांची एका वर्षातच झालेली दुरावस्था ही खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार अधोरेखीत करीत आहे. परभणी शहरातील नटराज रंग मंदिर येथे मागील वर्षी कोवीड काळामध्ये खरेदी केलेल्या खाटांचा ढिग मांडला आहे. यातील अनेक खाट हे मोडकळीस आले आहेत व ते सध्या वापराच्या योग्य नसून गंजलेल्या अवस्थेत आहे. देशासह राज्यामध्ये सध्या कोवीड संक्रमणाचा धोका ऑमिक्रोन वेरियंट वायरस नव्या नावाने परसरण्याचा धोका आहे अशावेळी जिल्ह्यासह शहराची आरोग्य व्यवस्था सतर्क व सक्षम असणे अत्यंत महत्वाची आहे. आपत्ती काळामध्ये खरेदी केलेल्या साहित्याचे ऑडिट होत नसल्याने अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचे साहित्य महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेले आहे.करीता आपणास विनंती आहे की नागील वर्षी कोवीड संक्रमण काळात महानगरपालिका प्रशासनाने खरेदी केलेल्या साहित्याचे गुणवत्ता तपासणी करून कशी करावी व दोषींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कठोर कार्यवाही करावी असेही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, मीडिया प्रभारी नकुल होगे, अरुण कांबळे, आकाश नावळे, बळीराम नावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या