💥भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प महोत्सवाचे आयोजन...!


💥सूर्यनमस्कार संकल्प महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - शिक्षण सभापती गोपाळ आंधळे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गीता परिवार, नँशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन, पतंजली योगपीठ, क्रीडा भारती तसेच हार्टफुलनेस फाऊंडेशन, आयुष्य मंत्रालय या संस्थाच्या वतीने  75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प महोत्सव आणि सामुहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले आहे. या 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प महोत्सवात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगर परिषद शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती गोपाळ आंधळे यांनी एका प्रसिद्धपत्रकाव्दारे केले आहे.  

1 जानेवारी 2022 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर प्रांगणात होणाऱ्या या 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प महोत्सवात सहभागी होण्यासाठी www.75suryanamaskar.com या वेबसाईटवर वर आँनलाईन सोमवार, दि.30 डिसेंबर 2021 पर्यंत नाव नोंदणी करावी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक पातळीवर आपल्या देशाचा नाव लौकिक वाढवा या उददेशाने आणि राष्ट्र भक्तीचे तसेच योगाचे महत्त्व जगासमोर उंचवण्यासाठी या महोत्सवात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगर परिषद शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती गोपाळ आंधळे यांनी एका प्रसिद्धपत्रकाव्दारे केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या