💥नांदेड करांनी तब्बल 62 दिवसांनंतर पाहिली लालपरी....!


💥लातूर ते नांदेड बसने विभाग नियंत्रकानी केला प्रवास प्रवाशी जनतेनी दिला मनापासून आशीर्वाद💥

--------------------------------------------                

नांदेड ; काल ३१ डिसेंबर २०२१ रोजी वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य परिवहन महामंडळाची लातूर विभागाची लालपरी बस अहमदपूर परिसरातील बालाघाटाच्या डोंगर कडा ओलांडून माळेगावच्या खंडोबा देवस्थानचे दर्शन घेऊन नांदेडच्या दिशेने धावली बसमध्ये 70 प्रवाशी घेऊन निघाली तर एकुण 140 प्रवाशांचीचढ उतार केला. सदर बसमध्ये चालका‌च्या बाजूच्या सिटवर बसुन लातूरचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांनी लातूर ते नांदेड असा प्रवास केला व कामगीरीवरिल चालक वाहकाना आधार दिला व प्रवाशांची सेवा करण्याची हिम्मत ही दिली.प्रवासादरम्यान  चालक-वाहकासमवेत जेवणही केले.

लातूर ते नांदेड प्रवास करणारे सर्व प्रवाशी व रस्त्यावरील बसकडे पाहनारा प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या आपुलकीने व आस्थेने  व आनंदित होऊन बस चालु झाली का? असे विचारत होता, शिरूर व लोहा येथील नागरिकांनी बसचे पुष्पहार घालून पुजन केले,नांदेडकरानी  तब्बल ६२ दिवसांनंतर रा.प.महामंडळाच्या लाल परी बसचे दर्शन घेतले.लातूर ते नांदेड जातानाच्या फेरीचे उत्पन्न प्रती कि.मी. ७५ रूपये प्रमाने १०.६०० रुपये आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या