💥48 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेला 3 जानेवारी पासून सुरूवात...!


 💥नामवंत 16 राष्ट्रीय हॉकी संघांना देण्यात आले निमंत्रण💥 

नांदेड (दि.15 डिसेंबर) : देशात नवाजलेली आणि मागील पन्नास वर्षांपासून राष्ट्रीय खेळ हॉकीची क्रीडाज्योति तेवत ठेवणारी नांदेडची सुप्रसिद्ध 48 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धा नांदेड येथे दि. 3 जानेवारी 2022 ते 9 जानेवारी 2022 दरम्यान दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ हॉकी नांदेड तर्फे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा मंडळाचे सचिव स. हरविंदरसिंघ कपूर यांनी येथे दिली.


नांदेड शहरात दरवर्षी शीख धर्माचे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवला समर्पित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर हॉकी स्पर्धा यावर्षी आयोजित होणार असून यावर्षीची 48 वीं स्पर्धा पार पाडण्यात येणार आहे. स्पर्धेत यावर्षी विविध राज्यांच्या सोळा राष्ट्रीय संघांना निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. यात पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना, मध्यप्रदेश व इतर राज्यांचे राष्ट्रीय संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.


 दि. 3 जानेवारी रोजी हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय नियमावली प्रमाणे खालसा हायस्कूल स्पोर्ट्स काम्प्लेक्स मिनी स्टेडियम मैदानावर हॉकी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून सुरुवातीला लीग प्रणालीने सामने खेलविण्यात येतील. लीग प्रणालीने गुणतालिकेच्या मागणीनुसार पुढील सामने नॉकऑउट प्रणालीने खेळविले जाईल. या स्पर्धेच्या जयत तयारीत दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष व नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब,स. जीतेन्द्रसिंघ खैरा, स. जसपालसिंघ काहलो, स. संदीपसिंघ अखबारवाले, स. महेन्दरसिंघ लांगरी, स. हरप्रीतसिंघ लांगरी, स. महेन्द्रसिंघ गाडीवाले, स. अमरदीपसिंघ महाजन, श्री विजयकुमार नंदे, स. जसबीरसिंघ चीमा यांनी परिश्रम सुरु केले आहेत. अशी माहिती सचिव हरविंदरसिंघ कपूर यांनी दिली. स्पर्धेतील प्रथम विजेता संघाला एक लाख रुपयांचे रोख बक्षीश आणि फिरते चषक देण्यात येईल. यंदा दुसऱ्या क्रमांक परितोषिकाच्या मागील धनराशित दहा हजाराने वाढ करून 51 हजार रोख आणि चषक देण्यात येईल. तसेच खेळाडूंसाठी इतर व्यक्तिक परितोषिके देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी खालसा मिनी स्टेडियम मैदान तयार करण्याचे काम हाती घेतले असून उत्कृष्ट अशा स्पर्धा पार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या