💥परभणीत शांतिदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने 201 गरजूंना गरम ब्लँकेटचे वाटप...!


💥या कार्यक्रमाच्या आद्यक्षस्थानी शांतिदुत चे संस्थापक अध्यक्ष  सुभाषचंद्र सारडा हे होते💥

 परभणी (दि.१९ डिसेंबर) - सध्या परभणीत कडाकीची थंडी पडल्याने गोरगरिबांच्या सेवेला नेहमीच धावून येणाऱ्या  शांतिदुत सेवाभावी संस्थेचा वतीने 201 गरजूनां गरम ब्लँकेट चे वाटप करण्यात आले मागील 25 वर्षांपासून दरवर्षी  हिवाळ्यात  शांतिदुतच्या वतीने ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाच्या आद्यक्षस्थानी शांतिदुत चे संस्थापक आद्यक्ष  सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का,मनपाचे आयुक्त देविदास पवार,जेष्ठ विधिज्ञ ऍड अशोक सोनी,पोलीस निरीक्षक कुदनकुमार वाघमारे,डॉ. दिनेश भुतडा,प्राचार्य सुरेश नाईकवाडे,राजकुमार धूत,सौ वर्षा सारडा,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. डॉ राहुल पाटील यांनी सुभाषचंद्र सारडा शांतिदुतच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवतात हीच खरी समाजसेवा आहे.

या कार्यक्रमामुळे गरिबांना थंडी पासून बचाव करता येईल असे ते म्हणाले तर  यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका,  अशोक सोनी यांनीही शांतिदुतच्या उपक्रमाचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,करण सारडा,केशव सारडा,गौरव बाहेती,राधिका बाहेती, सेजल सारडा  यांनी विशेष परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या