💥हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज....!


💥जिल्हा शासकीय रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु💥

हिंगोली (दि.१७ डिसेंबर) : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 63 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 666 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या