💥महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या जनसंख्या गणनेमध्ये एक मोठा समाज सर्वव्यापी समाज देशातील 17 राज्यांमध्ये आहे...!


💥महाराष्ट्रात तर बंजारा समाजाच्या तांडा वस्तीला आजही स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा नाही💥

लेखक - सतिष सातोनकर.....


काही विचारवंत व आकडे तज्ञांच्या मते या समाजाची आजच्या तारखे मध्ये (16cr ) सोळा ते साडे सोळा कोटी लोकसंख्या असावी.....अठराव्या शतकामध्ये गर्भ श्रीमंत असलेला हा समाज इंग्रजांनी 16 एप्रिल  1853 रेल्वे मुंबई येथे सुरू करण्यात आली पुढे मालवाहतूक करण्यासाठी व जंगल तोडून या देशातले महत्त्वपूर्ण दुर्मिळ लाकडी घेऊन जाण्यासाठी मौल्यवान वस्तू घेऊन जाण्यासाठी रेल्वेचे जाळे भारतभर पसरवले आणि हजारो वर्षापासून सोने,नाणे,दागिने,अन्नधान्य याचे संपूर्ण पारंपारिक दळणवळण करणाऱ्या बंजारा समाजावर उपासमारीची वेळ आली.

हल्दीघाटी च्या युद्धामध्ये महावीर श्री महाराणा प्रतापसिंह जी महाराजांकडून मुघलांच्या विरुद्ध राजपूत बहादूर विर सैनिकांसह मोठ्या संख्येने वीर बंजारा आणि भिल्ल समाज लढला पुढे त्याची जबर किंमत मुघल साम्राज्याने या समाजाकडून  वसूल केली वीर बंजारा आणि बहादूर भिल्लांची संपत्ती जप्त करणे त्यांना देशोधडीला लावणे असे काम साधारणता शंभर वर्ष केले गेले आपली संस्कृती आपला धर्म, आपली बोलीभाषा, आपली परंपरा आपली श्रद्धा, आणि सर्वात महत्त्वाचे गोपालन या समाजाचा आत्मा आहे आणि मग या सर्वांच संरक्षण करण्यासाठी ते जंगलात निघून गेले ते साधारणता दीडशे वर्ष या समाजाने जंगलात स्वतःला सुरक्षित ठेवले संस्कृतीला विचारांना धर्माला सुरक्षित ठेवले.

महाराष्ट्रात तर बंजारा समाजाच्या तांडा वस्तीला आजही स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा नाही यावरून मागच्या 70 वर्षातील लोकशाही मध्ये त्यांना काय न्याय मिळाला असेल याचा फक्त विचार करावा.....अशा या महान वीर बंजारा योद्धा समाजाला त्यांच्या संख्येनुसार राज्यांमध्ये सत्तेत प्रशासनात वाटा मिळाला का ? सामाजिक न्याय मिळाला का ? स्वातंत्र्यापूर्वी हा समाज बर्‍यापैकी श्रीमंत होता आज तो अत्यंत गरीब इकडे वाटचाल करतोय याला जबाबदार कोण ? राज्याच्या नियोजनामध्ये धनगर , बंजारा,  वंजारी, माळी, लिंगायत, यांची लोकसंख्या एकत्रित केल्यानंतर जी संख्या येते त्या संख्येनुसार त्यांचे प्रतिनिधित्व प्रशासन व राज्यव्यवस्थेत होते का आणि आहे का ?

ओबीसी आरक्षण विभागातला सर्वात मोठ्या समाजापैकी एक वीर बंजारा समाजावर आज रात्री(9.pm. today evening)नऊ वाजता राजकीय व सामाजिक विश्लेषण फेसबुक लाईव्ह....आपणास विनंती करण्यात येते की आपण या विश्लेषणात सामील व्हावे, मार्गदर्शन करावे आणि  सामाजिक आणि राजकीय विश्लेषण आपणास योग्य वाटल्यास शेअर करावे लाईक करावे पुढे पाठवावे...

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या