💥साखर कारखान्याद्वारे सभासदांना आखून देण्यात आलेली 150 टन ऊस खरेदीची मर्यादा वाढवा....!


💥बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करा ; प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥

परभणी - जिल्ह्यामध्ये यावर्षी मुबलक प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने जिल्ह्यामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. त्याशिवाय ऊसाचा उतारा पण वाढला आहे. अतिरिक्त ऊस झाल्यामुळे  शेतकऱ्यांचा हा अतीरिक्त ऊस साखर कारखाने स्विकारत नाहीत. यातच साखर कारखान्याद्वारे प्रति सभासद १५० टन ऊस खरेदीची मर्यादा आखून दिली आहे. परंतु यावर्षी उतारा जास्त आल्याने अनेक सभासद शेतकऱ्यांना १५० टनापेक्षा जास्त ऊस झालेला आहे.

 त्याशिवाय साखर कारखान्यांचे जे सभासद नाहीत त्यांच्या ऊसाचा पण प्रश्न निर्माण झाला आहे . अतिरिक्त ऊस झाल्याने व साखर कारखाने ऊस स्विकारण्यास तयार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नैराश्या पोटी आपला उभा ऊस जागेवर जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची दाट शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांच्या चकरा मारुन हैराण झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील व जिल्ह्यालगत असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक घेऊन कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांचा ऊस घ्यावा तसेच सभासदांना १५० टन ऊस खरेदीची मर्यादा वाढवून ३०० टन प्रति सभासद करावी याबाबत सूचना देऊन आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय यावा. तसेच संबंधित प्रकरण शासन दरबारी लावून यावर निर्णय घ्यावा या मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम  यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, मीडिया  प्रभारी नकुल होगे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग,वैभव संघई, शेख बशीर, सय्यद मुस्तफा इत्यादीच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या