💥शहिद जनरल बिपिन रावत व 13 सैन्य दलातील अधिकाऱ्यांना माजी विद्यार्थी संघ व परळीकरांकडून श्रद्धांजली...!


💥सायंकाळी 6 वाजता परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे देण्यात आलि श्रध्दाजली💥

परळी (दि.०९ डिसेंबर) - माजी विद्यार्थी संघाच्या वतिने चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) शहिद जनरल बिपिन रावत व 13 सैन्य दलातील अधिकाऱ्यांना श्रद्धांजली कार्यक्रम गुरुवार दि 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे घेण्यात आला.

नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,वैद्यकीय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे ,एपीआय गित्ते व माजी विद्यार्थी संघाचे अश्विन मोगरकर,सभापती गोपाळराव आंधळे, मोहन व्हावळे  यांच्या हस्ते शहिद जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे मेनबत्ती लावून व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले दरम्यान शहिद जनरल बिपिन रावत अमर रहे, भारत माता कि जय च्या घोषणा देऊन श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. श्रध्दांजलीच्या  कार्यक्रमा वेळी परिसरात भावुक वातावरण झाले होते.

यावेळी अश्विन मोगरकर यांनी शहिद जनरल बिपिन रावत व इतर सर्व शहिदांविषयी मनोगत व्यक्त केले.  प्रा. अतुल दुबे यांनी संचलन केले.शहिद जनरल बिपिन रावत यांच्या श्रध्दांजली कार्यक्रमाला अब्दुल करीम, व्यंकटेश शिंदे, राजेंद्र ओझा, विजय भोयटे, अनिल अष्टेकर, अरुण पाठक, नितीन समशेट्टे, जगन्नाथ साळुंके, अॕड.रमेश साखरे, रमेश चौंडे, कमलाकर हरेगावकर, प्रितेश तोतला, सचिन स्वामी, अमर देशमुख सर, सुंदर मुंडे, रामेश्वर कोकाटे, संगम फुटके, सुशील हरंगुळे, राहुल केंद्रे कल्पेश बियाणी, अनिष अग्रवाल, योगेश पांडकर, विजय दहिवाळ, संजय खाकरे, प्रकाश चव्हाण, प्रा. रवींद्र जोशी, प्रा. प्रवीण फुटके, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे, अनंत कुलकर्णी, महादेव गित्ते, विकास वाघमारे, मोहन राजमाने,  गणेश केंद्रे, जितेंद्र मस्के, धनराज कुरील, अच्युत जोगदंड, उमेश निळे,  निलेश राजमाने, शेख फतरु, बंडू जाधव आदीसह असंख्य परळीकरांनी पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या