💥वाशिम जिल्हा पोलिस प्रशासनाच्या कर्तव्य तत्परतेचे होत आहे सर्वत्र कौतुक...!


💥मदतीसाठी मुलीने केला एक मेल अन् वाशिम पोलिस तात्काळ मदतीसाठी मुलीच्या घरी💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-दि.१८/११/२१ ला वाशीम पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या ईमेल वर कारंजा येथील इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा मेल आला. सदर मेल मध्ये तिला एक अनोळखी व्यक्ती तिच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करून (ऑडिओ/व्हिडीओ) त्रास देत असल्याबाबात तक्रार केली होती. मा.पोलीस अधिक्षक वाशीम यांनी सदर चा ईमेल बघताच महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असणाऱ्या निर्भया पथकास सुचना देवुन तात्काळ सदर मुलीस मदत करण्याबाबात सांगितले. कारंजा निर्भया पथक टिम सदर मुलीच्या घरी पोहचुन तिची तक्रार समजुन घेतली.सायबर सेल वाशीम कडुन त्या मुलीला ज्या क्रमांकावरून कॉल येत होता त्याचे लोकेशन घेवुन त्या मोबाईल क्रमांकावर फोन करून शहानिशा केली असता त्याचे लोकेशन हे गुजरात राज्यातील पिपोदरा हे होते व त्याला ज्या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा होता तो क्रमांक व सदर मुलीचा मोबाईल क्रमांकामधील आकडे हे थोडेफार सारखेच असल्याने त्याचेकडुन चुकुन कॉल लागले बाबात सांगितले व परत त्याचेकडुन सदर मोबाईल वर कॉल करणार नाही

याबाबात हमी दिली झालेल्या प्रकाराबाबत ज्या व्यक्तीने कॉल केला होता ती व्यक्ती व त्याचे लोकेशन याबाबत निर्भया पथकाने सदर मुलीचे घरी जावुन तिला तिच्या आई वडीलांना याबाबत माहीती दिली. आमच्या मुलीने केलेल्या एका ई-मेल वरती वाशिम पोलीस दलाने तात्काळ मदत करून त्यांच्या घरी जावुन तकारीचे निरसन केले त्याबद्दल मुलीने व तिच्या आई- वडीलांनी तुम्ही पोलीसांनी अगदी कुटुबाप्रमाणे आमची मदत केली अशी भावना व्यक्त करून पोलीसांचे आभार मानले. सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कारंजा ग्रामिणचे ठाणेदार पोलीस निरीक्षक धंदर, पोउपनि. धोंडगे पोउपनि अंभोरे, पोहवा ५७९ महेंद्र रजोदिया व टिम ने केली. वाशिम पोलीस दल निर्भया पथक, वाशिम व्दारे असे आवाहन करण्यात आले की, कोणी आपल्याला त्रास देत असेल तर,आपला पाठलाग करीत आले तर,पोलीस हेल्पलाईन नंबर १००/११२ तसेच वाशिम नियंत्रण कक्ष व्हॉटसअॅप क्रमांक वर कॉल करून आपण माहीती दयायची आहे.आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे पोलिस विभागाकडुन सांगण्यात आले....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या