💥पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील नांदेड-हिंगोली रेल्वे गेटावर ९६ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे..!


💥दर्जाहीन कामा संदर्भात प्रसिध्दी माध्यमांनी वृत्त प्रकाशित करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली पाहणी💥


पुर्णा (दि.२५ नोव्हेंबर) - पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील रेल्वे लोहमार्ग नांदेड-हिंगोली गेटावर ९६ कोटी ६६ लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून तयार करण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथगतीने व माती मिश्रीत वाळू तसेच अल्पप्रमाणात सिमेंटचा वापर करून पुलाचे सिमेंट कॉक्रेंटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्या संदर्भात प्रसार माध्यमांतून वृत्त प्रकाशित होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकाशित वृत्तांसह या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी विशेष पथक पाठवले होते.


उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यास आलेल्या विशेष पथकामध्ये जनसंपर्क अधिकारी विनित टोके,फिल्ड ऑफिसर कुमार टाटा यांच्यासह अन्य सहकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता यावेळी विशेष पथकाने सिमेंट कॉक्रेंट उड्डाण पुलाच्या बांधकामाला पडलेल्या भेगांची पाहणी केली व यावेळी उपस्थित तक्रारदार प्रदिप नन्नवरे यांचे म्हणने ऐकून घेतले यावेळी संबंधित विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम कंत्राटदार एजन्सा एम/एस डिसीएस पि.व्ही राव यांना घटना स्थळावर बोलवून बांधकामासाठी वापरण्यात असलेल्या मातीयुक्त वाळू तसेच दर्जाहीन सिमेंट तसेच बांधकामावर पाण्याचा वापर होत नसल्या संदर्भात जाब विचारणे आवश्यक होते परंतु संबंधित विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशीचे नाट्य रंगवून सोपस्कार पुर्ण केल्याचे बोलले जात आहे.


संबंधित उड्डाण पुलाच्या बांधकामाला दि.२७ ऑगस्ट २०१९ रोजी सुरूवात करण्यात आली कामाचा कालावधी केवळ ११ महिन्यांचा असतांना कालावधी संपला असून तब्बल २७ महिन्या नंतरही संबंधित उड्डाण पुलाचे बांधकाम पुर्ण का झाले नाही ? या गंभीर प्रश्नाकडे अधिकाऱ्यांनी संबंधित गुत्तेदाराचे लक्ष का वेधले नाही ? असा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून या उड्डाण पुलाचे बांधकाम सर्वसामान्य जनता वाहन धारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे जवळपास १०० कोटी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून होत असलेल्या या उड्डाण पुलाच्या कामासाठी संबंधित गुत्तेदार हजारों ब्रास निकृष्ट दर्जाच्या माती मिश्रीत रेतीचा वापर करीत असून या रेतीच्या साठ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकवेळ तपासणी करणे अत्यावश्यक असून बांधकामाच्या दर्जेदार व मजबूत व्हावे याकरिता संबंधित बांधकामावर वेळोवेळी पाणी टाकणे आवश्यक असतांना संबंधित गुत्तेदार पाण्याचाही वापर करीत नसल्यामुळे पुलाचे बांधकाम ठिसूळ होत असून बांधकामाला जागोजाग तडा पडत असल्यामुळे भविष्यात फार मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या