💥पूर्णेत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून रेल्वे जनरल मॅनेजर ला निवेदन आणि चर्चा...!


💥यात्रेकरूंना सर्व प्रकारच्या गाड्यांचे पासेस देण्याची मागणी💥

पूर्णा : २ नोव्हें.- आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया परभणी कडून रेल्वे जनरल मॅनेजर यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

     डी वाय एफ आय ही युवक संघटना मागील जानेवारी पासून रेल्वेला विविध मागण्यांचे निवेदन देत आंदोलने करीत आलेली आहे. कोरोना लॉकडाउन नंतर यात्रा गाड्या सुरु करा, तिकीट काउंटर सुरु करा, पासेस द्या या मागण्यांना घेऊन कित्येक निवेदने डी आर एम आणि जी एम यांना संघटनेकडून देण्यात आले होते आणि अवश्यक तेव्हा आंदोलन सुद्धा केले. आज परत १. सर्व यात्रा गाड्या आधीच्या सारख्या सुरु करा आणि सर्व  special गाड्या रद्द करूण त्यांना आधीच्या सारख्याच चालवाव्यात,

२. डेमो चालवायचीच असेल तर मुंबई च्या लोकल सारखी चालवावी आणि त्याचे दोन ते तीन पटीने वाढविलेले भाडे कमी करून आधीच्या इतके करावे.

३. यात्रेकरूंना सर्व प्रकारच्या गाड्यांचे पासेस द्या.

४. रेल्वेचे खासगीकरण पूर्णपणे थांबवा आणि त्यांना सरकारी नियमांनी चालवा. ५. पूर्णा जं. मध्ये रेल्वे डिव्हिजन स्थापित करा.

६. पूर्णेत आधीच्या सारखे डिझेल शेड सुरु करा जेणेकरून येथील तरुणांना रोजगार मिळू शकेल. ७. जी एम च्या अधिकारात येणाऱ्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचा कॉन्ट्रॅक्ट बेसिस रद्द करून त्यांना पर्मनंट बेसिस वर नियुक्त करा, इत्यादी मागण्यांचे निवेदन देऊन जनरल मॅनेजर यांच्याशी चर्चा सुद्धा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पण या मागण्या सोडवल्या गेल्या नाहीत तर 15 दिवसांनी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.

          निवेदनावर डी वाय एफ आय चे जिल्हासचिव नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, अजय खंदारे, सचिन नरनवरे, जय एंगडे आदींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या