💥पाथरी नगर परिषदेचे गटनेते जुनेद खान दुर्रानी यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करणार चारशे वृक्षांची लागवड...!


💥अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी दिली💥

पाथरी:-नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आ बाबाजानी दुर्रानी आणि त्यांचे सुुुपुत्र नगर परिषदे ळचे गट नेते जुनेद खान दुर्रानी यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे होत असतात.या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वाघाळा -फुलारवाडी रस्त्या लगत चारशे वृक्ष रोपट्यांची लागवड करून न प गटनेते जुनेद भैय्याचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती राविकाँचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी दिली.


पाथरी नगर परिषदेचे गट नेते जुनेद खान दुर्रानी यांचा वाढदिवस या वर्षी सामाजिक उपक्रमांच्या रेलचेलीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या वर्षी पाथरी न प ला सलग तिस-या वर्षी स्वच्छतेत पुरस्कार मिळाला राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण २० नोव्हेंबर रोजीच दिल्ली येथे विज्ञान भवणात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा दुग्ध शर्करा योग जुळून आल्याचा आनंद पाथरीकरां मध्ये असून या मुळेत युवा नेते जुनेद खान दुर्रानी यांचे कार्यकर्ते,चाहते राकाँचे पदाधिकारी या वेळचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत उत्साहात साजरा करत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने पर्यावरण रक्षणा साठी वाघाळा ते फुलारवाडी या रस्त्याच्या बाजूंच्या काटेरी झुडपांची साफ सफाई करत चारशे खड्याची निर्मिती केली असून शनिवार विस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी वृक्ष लागवडीचा प्रारंभ होणार असल्याची माहिती राविकाँ तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या