💥परभणी जिल्ह्यातील अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा ; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दिल्या लेखी सुचना....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्याला यश💥

परभणी - प्रहार जनशक्ती परभणीच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व पदाधिकाऱ्यांनी श्रीमती आंचल गोयल मॅडम, जिल्हाधिकारी परभणी यांची अनुकंपा धारकांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन मागील १० ते १५ वर्षापासून रखडलेल्या जिल्ह्यातील विविध विभागातील अनुकंपा भरती तात्काळ करणे बाबत जिल्ह्यातील विविध विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन शासन निर्णय ११ सप्टेंबर २०१९ नुसार सामाईक यादी प्रमाणे तात्काळ अनुकंपा भरती करून अनुकंपा धारकांना न्याय द्यावा अशी मागणी चे निवेदन दि .२०.१०.२०२१ दि १५.११.२०२१ रोजी देण्यात आले होते व याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्यात्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. तसेच जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. टाकसाळ साहेब यांची याच विषयावर भेट घेतून त्यांना ही निवेदन देण्यात आले होते. यावर श्री. टाकसाळ साहेबांनी १ डिसेंबर २०२१ अगोदर भरती करण्याचे आश्वासन दिले होते.

आज दि. २५.११.२०२१ रोजी मा.नायब तहसीलदार आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला पत्र देऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनातील मागणीनुसार शासन निर्णय दि.११ सप्टेंबर २०१९ नुसार अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकारी यांची दि.१७.११.२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे मा. जिल्हाधिकारी, मॅडम परभणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व या बैठकीत संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनावरील व जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे ठेवण्यात आलेल्या सामाईक अनुकंपा यादीतील उमेदवारांना शासन निर्णयाप्रमाणे नियुक्ती देण्याच्या लेखी सुचना दिल्याबाबत कळविले आहे.

या निर्णयामुळे मागील १० ते १५ वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा होऊन प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. संबंधित निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, अनुकंपाधारक गजानन घाटगे, सतीश गलांडे, ज्ञानेश्वर सायंत, अभिजित गात, गणेश देशमुख, अक्षय चाकोते, परवेश अहमद, शुभम हत्तीअंभीरे, अमीत राणाळ, विजय कांबळे, जीवन भदरगे, दिलीप कांबळे, माथव पोटे, महेश चव्हाण, विष्णु मुळे, सतीश भोसले, संतोष भोकरे, शेख नजीर आदींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या