💥निराधार महिलांच्या पुनर्वसनाची गरज : हेरंब कुलकर्णी


💥असंख्य महिला या काळात विधवा झाल्या त्यांना धीर देऊन निराधारांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे असेही कुलकर्णी म्हणाले💥 

सेलू जि.परभणी : करोनाने उध्वस्त झालेल्या महिलांची आर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे, असंख्य महिला या काळात विधवा झाल्या आहेत. त्यांना धीर देऊन निराधारांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी शनिवारी (१३ नोव्हेंबर) केले. 

सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयात आयोजित कार्यकामात ते बोलत होते प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा.नागेश कन्हेकर, मुख्याध्यापक नारायण सोळंके,नगरसेवक रहीमखान पठाण, कॉम्रेड अशोक उफाडे यांची उपस्थिती होती.

कुलकर्णी म्हणाले, " 

शासनाच्या विविध योजनांतर्गत निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, कर्जाचे वनटाइम सेटलमेंट करणे, बचतगटामार्फत सहाय्य करणे. तालुकानिहाय सर्वेक्षण करून न्याय देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आधार दिला तर त्या आयुष्यभर उभ्या राहतील." या वेळी प्रज्ज्वल ठाकर या बालचित्रकाराचे कौतुक  कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड, तर  शरद ठाकर यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या