💥मिशन कवच कुंडल लसिकरण मोहिमेला मंगरूळपीर शहरात ऊत्फुर्त प्रतिसाद...!


💥अशोकनगर येथे घरोघरी जावून लसिकरणाची जनजागृती💥

✍️फुलचंद भगत

वाशिम:-मिशन कवच कुंडल लसिकरण मोहिमेअंतर्गत मंगरूळपीर शहरातील अशोकनगर येथे लसिकरण करण्यासाठी अंगनवाडी सेविकांनी घरोघरी जावून लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले व पाञ लोकांना लसिकरण मोहिमेअंतर्गत लसिकरण केले.

           कोरोनाचा संसर्ग कमी झाला तरी कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ९ आॅक्टोबरपासुन वाशिम जिल्ह्यात मिशन कवचकुंडल लसिकरण मोहिम राबवणे सुरु आहे.या मोहिमेत जास्तीत जास्त पाञ व्यक्तींचे लसिकरण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी दिले आहे.या अनूषंगाने मंगरुळपीर नगरपरिषदेअंतर्गत विषेश मोहिम राबवण्यासाठी पथकाची स्थापना केली.या पथकामार्फत वार्डामध्ये घरोघरी जावून लोकांना लसिकरणाविषयी जनजागृती करुन लसिकरणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.सर्वांच्या मार्गदर्शनाने लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची तयारी दर्शवली व याकरीता वार्डामध्ये लसिकरण कॅम्प घेवून पाञ व्यक्तीचे लसिकरण करण्यात आले.या मोहिमेमध्ये न.प.कर्मचारी किशोर कांबळे,शिक्षक विनायक देवकते,आरोग्य विभागाचे मंगेश तायडे,डाटा आॅपरेटर अक्षय देवळे,अंगनवाडी सेविका अरुणा वानखडे,ललिता भगत,लक्ष्मीबाई गारवे,अंगनवाडी मदतनिस जयश्री इंगोले,करुणा तोडकर,ऊज्वला भगत आदींचा समावेश होता.हे सर्वांच्या सहकार्याने लसिकरण मोहीम चांगल्या प्रकारे पार पाडणे सुरु आहे....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या