💥बुलढाणा जिल्ह्याचे सच्चे भुमिपुत्र : खा.प्रतापराव जाधव💥रमला जो माणसात...याने माणूस जपला...प्रत्येकाला असे वाटते...हा माणूस आपला...💥

 रमला जो माणसात ,,,

याने माणूस जपला,,,,

प्रत्येकाला असे वाटते,,,,

हा माणूस आपला,, 

असे आमचे भाऊ व सर्व जिल्हा ज्यांना भूमीपुत्र या नावाने ओळखतो  अश्या आमच्या नेत्याचा आज जन्मदिवस ,,भाऊ तुम्ही 1995  पासून सतत अंगावर गुलाल घेत आलेले आहात भाऊ तुमची आणि माझी खरी ओळख ही 2009 मध्ये झाली कारण बुलढाणा लोकसभा मतदार संघ हा ओपन झाला होता आणि तुम्ही ह्या जिल्ह्यात आपल्या पायाला भिंगरी बांधून सर्व शिवसैनिकांच्या भेटी, बैठका घेऊन त्यांच्या अंगात एक ऊर्जा निर्माण करत होता बघता  बघता त्यात भाऊ तुमच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही चिखली शहर शिवसेनेच्या वतीने तुमची साखर तुला ठेवण्यात आली त्यात तुमचा आणि कार्यकर्त्यांचा संपर्क अजून गोड झाला लगेच बुलढाणा लोकसभा खासदारकीची उमेदवारी ही तुम्हाला पक्षाने जाहीर केली त्या निर्णयाने आम्हाला काम करण्याचा उत्साह वाढला कारण पहिल्यांदा आम्हाला या जिल्ह्याचा खासदार मिळणार होता पण ह्या निवडणुकीत तुमच्या विरोधात राष्ट्रवादीने एका दिग्गजां ला उमेदवारी देऊन  व त्यांनी ह्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान तुमच्या वर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका केली पण भाऊ तुम्ही त्यांना प्रत्युत्तर न देता आपल्या संपर्कावर भर दिला व जिल्ह्यात असे एकही गाव सोडले नाही तिथे तुम्ही पोहचले नसेन हीच तुमची प्रेरणा पाहून आमच्या सारखे कार्यकर्ते अजून जोमात जिद्दीने पेटले व जसा मतदानाचा दिवस उजाडला व आमच्या अंगातला सैनिक जागा होऊन तुमच्या नावापुढे धनुष्यबाण हे चिन्ह जनतेला कसे दाखवता येईन व जास्तीत जास्त मते हे तुमच्या पारड्यात टाकता येईल हा पर्यंत केला व शेवटी निकाल असा लागला की ह्या अटी तटीच्या निवडणुकीत तुमचा  भरघोस मतांनी विजय होऊन ह्या जिल्ह्यावर भगवा फडकला व आम्हाला आमचा हक्काचा खासदार मिळाला नंतर तुमच्या संपूर्ण जिल्ह्यात जेव्हा विजयी मिरवणुका काढण्यात आल्या तेव्हा संपूर्ण जिल्हा हा भगवामय होऊन त्याचे रूपांतर प्रतापगड असे झाले चिखलीला जेव्हा तुमचा सत्कार  चालू असताना तुम्ही त्या कार्यक्रमात प्रत्येकाला आपुलकीने विचारपूस करून त्यांचा उत्साह वाढवत होते त्यात अचानक तुम्ही मला स्टेज वरून मला विलास इकडे ये असे आवाज देतात त्यावेळी भाऊ मी अत्यंत भावुक झालो होतो डोळ्यात त्या आवाजाने अश्रू अनावर आले होते कारण मला माझा खरा पाठीराखा माझा मार्गदर्शक  तुमच्या रूपाने भेटला होता नंतर भाऊ तुम्ही एव्हढ्या वर न थांबता संपूर्ण जिल्ह्याचे सूत्र आपल्या हाती घेऊन पूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी बदलून सर्व नवीन कार्यकर्त्यांनी संधी दिली त्यात तुम्ही माझ्या खांद्यावर चिखली शहर शिवसेना उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली व त्या त्या माध्यमातून मी सर्व सामान्य माणसाचे कामे हे अत्यंत जबाबदारीने तुमच्या माध्यमातून कसे मार्गी लागतील याचा.           प्ररयत्न  केला व ते समाधान पूर्वक केले त्याचीच एक पावती म्हणून तुम्ही मला नव्यानेच आदित्य साहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या युवा सेनेच्या बुलढाणा कार्यकारिणीत ऋषी दादा जाधव यांच्या नेतूत्वात चिखली युवा सेना शहर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती पण भाऊ मी अत्यंत चोख  पणे पार पाडत आहे भाऊ तुम्ही मला एव्हढ्यावरच न थांबवता आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली ही योजना जिल्ह्यात येताच आमच्या चिखली शहरात ह्या शिवभोजन केंद्राची जबाबदारी माझ्या कडे देऊन एक प्रकारे जनतेची सेवा करण्याची संधी दिली भाऊ मनापासून तुमचे आभार पण तुम्ही सांगितले आहे आभार हे आपल्यांचे मानत नसतात अश्या आमच्या ह्या दिलदार मनाच्या राजास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्या भाऊ तुमच्या राजकीय जीवनातील राहिलेल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होवो हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्या च्या वतीने आई जगदंबे कडे प्रार्थना करतो  .


आपला

 विलास पांडुरंग घोलप 

युवा सेना शहर प्रमुख चिखली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या