💥पुर्णा तालुक्यातील कानखेड शिवारातील रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीच्या नावावर चालतोय नियमबाह्य कत्तलखाना....!


💥कत्तलखान्यात नियमबाह्य दुभत्या व गाभन जनावरांची होतेय कत्तल ; सनाच्या दिवशीही होतेय मुक जनावरांची कत्तल💥

☀️दिवाळी असो की दसरा पधरा आगस्ट असो की सवीस जानेवारी रिल्याबल ऑग्रो फूड्स कंपनीचे काम काज आसते चालूच☀️

☀️कामगाराच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी ही त्याचावर कामावरुन काढण्याचा दबाव टाकून करून घेतल्या जाते काम☀️ 

पूर्णा (दि.०६ नोव्हेंबर) : तालुक्यातील कानखेड शिवारात रिलायबल ऑग्रो फूड्स कंपनीच्या नावावर मोठ्या प्रमाणात दुभत्या व गाभन जनावरांची कत्तल केली जात असून भर दिपावली सना मध्ये म्हशींसह हलगटांची अमानुषपणे कत्तल चालूच असुन हिंदु परंपरे नुसार दिपावलीत गोवर्धन पुजेच्या दिवशी गाई-म्हशींची पुजा केली जाते या महत्वाच्या दिवसासह लक्ष्मी पुजनाच्या दिवसी ही संबंधित कंपनी चालू ठेऊन दुभत्मा म्हशींची कापन्याच काम चालूच आहे. 

संपूर्ण देशभरातील जनावरांची कत्तलखाने बंद असतांना कामगारांना दिवाळीच्या सुट्या असतांना मात्र रिलायबल ॲग्रो फुड्स या कंपनीत भर दिवाळीत कामगारांना सुट्टी न देता सुट्टीच्या दिवशी ही कंपनीतील स्थानिक कामगारांसह राज्याबाहेरील कामगारा वर कामावरूण काढण्याचा दबाव टाकून काम करून घेतल्या जात आहे संबंधित कंपनीत कामगारांना कामगार कायद्याची पायमल्ली करून वेठविगारां प्रमाणे म्हणजेच गुलामां प्रमाणे वागणूक दिली जात असून कामगारांनी विरोध केला तर कामावरूम काढून कंपनी बाहेर काढले जाते संबंधित कंपनी प्रशासनाने दि ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिपावली सना दरम्यान कंपनी सुरू ठेवली ही कंपनी आठवड्यातील दर शूक्रवारी कधी दुपार पर्यंत तर कधी पूर्ण दिवस बंद ठेवून कामगारांना सुट्टी दिली जात असते. परंतु भर दिवाळीत सुध्दा कंपनी चालु ठेवुन कामगारांकडून सक्तीने काम करून घेतल्या गेल्याने या कंपनीच्या अनागोंदी मनमानी कारभाराच्या चौकशी संदर्भात मागील अनेक वेळा सामाजिक संघटनांकडून निवेदन देण्यात आली असतांना आपल्यावर होणारी संभाव्य कारवाई रोखण्यासाठी संबंधित कंपनी प्रशासनाकडून अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासल्या जात असल्यामुळे या रिलायबल ॲग्रो फुड्स कंपनीवर कारवाई होत नसल्याचे बोलले जात असून या कंपनीच्या कामगार विरोधी धोरणाची व पशुहत्या कायद्याच्या उल्लंघनाची सखोल चौकशी व्हावी याकरिता दि.२७ आक्टोंबर २०२१ रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदन देण्यात आले असुन या निवेदनाच्या प्रतिलिपि राज्याचे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र व पर्यावरण विभाग,सरकारी कामगार विभाग परभणी तसेच तहसीलदार पूर्णा व सहायक आयुक्त पशुधन पूर्णा याना देवुन ही कोणती ही चौकशी व नोटिस न गेल्याने ही कंपनी राजरोसपणे कारभार करते या कंपनीत महाराष्ट्र दिन १ मे तसेच २ आक्टोंबर गांधी जयंती तसेच स्वातंत्र्य दिन १५ आगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला ही रात्रीला बिंनधास्त कंपनीचे काम चालू असते त्यामुळे संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करून कंपनी सिल करण्याची मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या