💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा गावकऱ्यांच्या वतीने नागरी सन्मान...!


💥शिक्षक आबनराव पारवे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे मिळाला "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार💥


पुर्णा ; तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आबनराव पारवे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे दिला जाणारा "राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021"  मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप-मानाचा फेटा,मानकरी बॅच,महावस्त्र,गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी,फुकटगाव यांच्या वतीने पारवे सरांचा सपत्निक जोड आहेर देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा चेअरमन माणिकराव बोकारे,पोलिस पाटिल ग्यानोबा बोकारे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री सोपानराव बोकारे,शा.व्य.समिती अध्यक्ष गंगाधर बोकारे,शाळा व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष बालाजी बोकारे,शाळेचे मुख्याध्यापक गोविंद नलबलवार व तसेच गावातील जेष्ठ मंडळी,नवयुवक तरुण मंडळी,शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


पुर्णा पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोकारे यांनी मनोगतात पारवे सर हे सतत शाळेत व गावातील प्रत्येक कामात स्वतः होऊन कार्यरत असतात. त्यांना जराही कामाचा कंटाळा नाही.असे त्यांनी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी शिक्षक पारवे सरांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की हा सन्मान माझा एकट्याचा नसुन मला सतत प्रेरणा देणाऱ्या सर्व पाठीराख्यांचा आहे.विद्यार्थ्यांसाठी सतत कार्य करायचे आहे व सर्व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पहायचे आहेत.त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत राहिल.

 कार्यक्रमाचे संचलन भागवत शिंदे यांनी केले तर विलास बोकारे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी रघुनाथ बोकारे,नामदेव बोकारे,अंकुश बोकारे,हनुमान बोकारे,बापुराव बोकारे,दत्तराव बोकारे यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या