💥विकते ते पिकवण्याचे व स्वतः विकण्याचे तंत्र आत्मसात करा -- कांतराव झरीकर


💥पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप ची मासिक बैठक संपन्न💥

पूर्णा ; तालुक्यातील मौजे सुकी येथे दि. 17 नोव्हेंबर रोजी प्रगतशील शेतकरी शंकरराव काळबांडे यांच्या मळ्यात पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप ची मासिक बैठक व वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुकी येथील उपसरपंच भागवतराव काळबांडे हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिभूषण कांतराव झरीकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,  उपशिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे, लक्ष्मी नृसिंह शुगरचे संचालक अॅड. न.चि.जाधव, दैनिक गोदातीर समाचार चे संपादक अडवोकेट रमेशराव गोळेगावकर, पूर्णा पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण बनसोडे,तांत्रिक सहाय्यक अरूण राठोड, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, शेती सेवा ग्रुपचे संस्थापक प्रतापराव काळे,  अमृतराज कदम, गजानन आंबोरे, भागवतराव पांचाळ, गोविंदराव दुधाटे, संभाजीराव भोसले,पंढरीनाथ शिंदे,शंकरराव काळबांडे यांच्यासह इतर मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षलागवड परभणी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव व मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 


महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवड करून शेतकरी फळबागा उभ्या करून आत्मनिर्भर होऊ शकतात. यावर्षी पूर्णा तालुक्यातील शेतकर्‍यांना 51 कोटी रूपये निधी आपापल्या शेतात वृक्षलागवड करण्यासाठी मंजूर केल्याचे ओमप्रकाश यादव यांनी सांगितले शेतकरी आणि साखर कारखाना प्रशासन दोघांनी हातात हात घालून एकत्र काम केले तर दोघांचेही हित साधू शकते असे ॲड नचि जाधव यांनी सांगितले व श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याची दारे प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी सदैव खुली असून शेती सेवा ग्रुपशी जवळीक निर्माण झाल्याने आपणास खूप आनंद व समाधान वाटल्याचे सांगितले. 

नवनवे प्रयोग, विक्रमी उत्पादन व त्याचे मार्केटिंग यात उत्तरोत्तर प्रगती करत असून नवनवे शेतकरी शेती सेवा ग्रुपसोबत जोडल्याने ग्रुपची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रतिपादन अॅड. रमेशराव दुधाटे- गोळेगावकर यांनी सांगितले सर्वांच्या अनौपचारिक स्वागत सत्कारानंतर शेती सेवा ग्रुप तालुका पूर्णाचे नवीन प्रयोगशील सदस्य कृष्णा काळे यांनी त्यांच्या के.के.प्रॉडक्ट्सबद्दल माहिती दिली तर खांबेगाव येथील युवा शेतकरी ज्ञानोबा गव्हाळे यांनी मिरची उत्पादनातून आर्थिक समृद्धी कशी आणता येईल याचे अनुभव कथन केले. मिरची लागवड करतानाच्या संभाव्य अडचणी व धोके लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. 

तर धनगर टाकळी येथील एकरी 85 टन ऊस उत्पादन करणारे शेतकरी रंगनाथ शेरकर यांनी आपल्या अनुभवातून प्राप्त माहिती शेतकर्‍यांना देऊन आपणही विक्रमी उत्पादन घेऊ शकतो हे दाखवून दिले एकुरखा येथील गजानन तांबे यांनी कोथिंबीर लागवड व इतर सर्वसमावेशक अनुभव कथन केले. त्यानंतर कृषीतज्ज्ञ मनोज आगलावे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास परिसरातील युवा व प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरराव काळबांडे, माऊली काळबांडे, गोविंदराव दुधाटे, गोविंद पैलवान, परमेश्वर काळबांडे, मारोती शिवाजी, भानुदास रामकिशन, गोविंद ज्ञानोबा यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या