💥महागाई विरोधात शिवसेनेचा यल्गार ; शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार...!


💥या मोर्चात शिवसेनानेते चंद्रकांतजी खैरे,मंत्री.संदिपानजी भुमरे यांची प्रमुख उपस्थिती💥

  ✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर / औरंगाबाद  (दि.९ नोव्हेंबर) - सातत्याने वाढत्या महागाईच्या भष्मासुराने सर्वसामान्य जनतेमध्ये संताप निर्माण झाला असून मोदी सरकारने २०१४ साली महागाई विषयी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे सर्व जिवनावश्यक वस्तुशिवाय बँकींग, बांधकाम वस्तु, शेतीसाठीची रासायनिक खते बि-बीयाणे सर्वच बाबींच्या दरवाढीने त्रस्त जनतेचा संताप शिवसेना रस्त्यावर उतरुण व्यक्त करणार असुन शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेनानेते खासदार संजयजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांना कळविले आहे.

या मोर्चात शिवसेनानेते चंद्रकांतजी खैरे, ना. संदिपानजी भुमरे, मा. अब्दुलजी सत्तार, संपर्क प्रमुख मा. विनोदजी घोसाळकर, आमदार मनिषाताई कायंदे, आमदार सर्वश्री प्रदिपजी जैस्वाल, संजयजी शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, नंदकुमार घोडेले यांचीही प्रमुख उपस्थिैती राहील. हा मोर्चाची क्रांतीचौक येथुन सुरुवात होऊन गुलमंडी येथे सभेने समारोप होईल त्या आधी बुधवार १० नोव्हेंबर रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प, पं.स,  गट गणनिहाय महागाई निरोधात स्वाक्षरी अभियान स.१० ते १ वेळात राबविण्यात येईल, गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी एक अभिनव आंदोलन करण्यात येईल. त्या अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनाला निवेदने देऊन पेट्रोलपंप, गैस एजन्सीज ला संरक्षणाची मागणी करण्यात येईल.

या महागाई विरोधी यल्गार मध्ये सर्व शिवसैनिक - महिला आघाडी - युवासेना- इतर अंगीकृत संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजु राठोड, अवचित वळवळे, भाऊ सांगळे, अविनाश पाटील, संतोष काळवणे, अशोक शिंदे, राजेंद्र राठोड, विनोद बोंबले, किशोर अग्रवाल, कृष्णा डोणगांवकर, संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, बप्पा दळवी, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, राखी परदेसी, समन्वयक कला ओझा, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, केतन काजे, राजु वरकड, सचिन वाणी, सुभाष कानडे, आबा काळे, देविदास लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. जीजा कोरडे, कृष्णा पवार, अण्णा लबडे, हनुमंत भोंडवे, युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, जिल्हायुवा अधिकारी हनुमान शिंदे, मचींद्र दवेकर, किशोर चौधरी, कैलास जाधव यांनी केले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या