💥इंडियन रिपोर्टस असोसिएशनच्या वतीने निराधार गरजू महिलांना साड्यांचे वाटप...!


💥पत्रकारितेबरोबरच सामाजिक बाधिंलकी जोपासत असल्याचा प्रत्यय💥 

परभणी - सर्व समाजातील निराधार, विधवा महिलांना दिपावलीनिमित्त इडिंयन रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने साड्यांचे वाटप करून पत्रकारितेबरोबरच सामाजिक बाधिंलकी जोपासत असल्याचा प्रत्यय दिसून आला आहे.


दिपावलीमध्ये हिंदु समाजातील  निराधार, विधवा महिलांना मानसिक आधार तसेच विविध समाजातील असहाय्य महिलांनाही अल्प प्रमाणात का होईना सहाय्य करण्याचे हेतुने , परभणी येथील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या' ' धर्मभूमी ' च्या कार्यालयात दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या कार्यक्रमात ,ज्येष्ठ पत्रकार तथा दै.महानगर चे संपादक शेख ईफ्तेकार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निराधार, विधवा महिलांना फराळ देऊन साड्यांचे वाटप  करण्यात आले.

इंडियन रिपोर्टस असोसिएशन नविदिल्ली चे परभणी जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे , मीडिया चिफ देवानंद वाकळे ,परभणी तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष ऊत्तम धायजे , ईरा चे परभणी प्रेस फोटोग्राफर अध्यक्ष संजय घनसावंत परभणी शहर अध्यक्ष मयूर मोरे दै.महनगर चे कार्यकारी संपादक  यांची उपस्थिती लाभली होती .   या साडी वाटप कार्यक्रमात वांगी रोड, शांतिदूत नगर, संत कबीर नगर परिसरातील महिला उपस्थित होत्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या