💥परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्णा शाखेतर्फे निराधारांची दिवाळी गोड....!


💥बँकेचे अध्यक्ष सुरेशराव वरपूडकर यांच्या नेतृत्वाखालील विविध शाखांमधून अनुदान वाटप सुरू💥 

पूर्णा:- शहरातील व तालुक्यातील निराधार बांधवांची दिवाळी गोड करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँक नवामोंढा पूर्णा शाखेने केली आहे .बँकेचे अध्यक्ष सुरेशराव वरपूडकर यांच्या नेतृत्वाखालील विविध शाखांमधून अनुदान वाटप सुरू आहे.पूर्णेतही नवा मोंढा शाखेतून निराधारांना ४९ लाख ७२ हजारांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे निराधारांची दिवाळी गोड झाली.या शिवाय बळीराजा साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ कोटी ३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.सदरील शाखेतून शिक्षकांच्या पगारी नियमित होत असतात.या शाखेस पूर्णा शहरासह तेहत्तीस गावे व बावीस सोसायटी जोडल्या आहेत. या कामी शाखाधिकारी अशोक साबणे यांच्या सह बँकेचे कर्मचारी व्ही एम काळे ,व्ही डी कदम, पंचांगे,हनुमान चट्टे ,के एन काजी ,यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या