💥वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांची विशेष मोहिम...!


💥विशेष मोहिमे दरम्यान घेतला अवैध धंदयावर केलेल्या कारवाईसह हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा आढावा💥

✍️फुलचंद भगत

वाशिम : जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांनी वाशिम जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारी तसेच अवैध धंदयावर आळा घालण्याकरीता दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशित केले. 

              विशेष मोहिमे दरम्यान वाशिम जिल्हयातील माहितगार गुन्हेगार,वारंवार गुन्हे करणारे. गुन्हेगार,हिस्ट्रीशिट वर असलेले गुन्हेगार चेक करण्याबाबत आदेशित केले.त्या अनुषंगाने दिनांक १६/११ /२१ ते २२/११/२१ या कालावधीत वाशिम जिल्हयातील १३पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष पथके तयार करुन, एकुण १०९ हिस्ट्रीशिटर,माहितगार गुन्हेगार १२०,

दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले १२० आरोपी चेक करण्यात आले. तसेच जातीय दंगल करणारे

एकुण ४७५ गुन्हेगार चेक करण्यात आले.दारु बंदी कायदयान्चये एकुण ६४ केसेस दाखल करुन ६४ इसमाविरुध्द दारुबंदी कायदयान्वये

कारवाई करण्यात आल्या व त्यात १,०८,८५०/-रुपयाचा माल जप्त करण्यात आला. जुगार कायदयान्वये एकुण ४० केसेस दाखल करुन ८५ इसमाविरुध्द जुगार अधिनियमान्वये कारवाई करण्यात आल्या व त्यात ४८,०७१/-रुपयाचा माल जप्त करण्यात आला.वाशिम जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसावा याकरीता जेल मधुन सुटलेल्या आरोपीवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. वाशिम जिल्हयात अशा प्रकारचे गुंडगिरी करणारे,अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. तरी जनतेने गुंड प्रवृत्तीच्या इसमांविरूद्ध न घाबरता पुढे येवुन पोलीस ठाणे येथे तकारी कराव्यात जेणे करून गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात येतील. वाशिम जिल्हयात अशाच प्रकारे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहेत.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या