💥पुर्णेतील रेल्वे मैदानावर एक दिवसीय फूट बॉल सोहळ्याचे थाटात उदघाटन...!


💥खेळाडूंनी इतिहासाची पुनरावृति करावी, पुन्हा खेळाची वैभवशाली परंपरा निर्माण करावी - प्रकाश कांबळे

पूर्णा : पूर्णा येथे  रेल्वे मैदानावर खुल्या फुटबॉल सामन्यांचे उदघाटन रिपाई नेते प्रकाश कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले या एक दिवसीय टोरनामेंट मध्ये सहभाग नोंदविला, या प्रसंगी बोलतांना प्रकाश कांबळे म्हणाले, बऱ्याच वर्षांनी पूर्णा येथे मैदानावर  खेळाडूंनी हे मैदान फुलांच्या  बागेसारखे पुन्हा नटल्याच्या भावना व्यक्त करून पूर्णेतील जुन्या खेळाडूंनी खेळात मिळविलेल्या यशाचा उल्लेख केला, खेळाडूंनी इतिहासाची  पुनरावृति करावी, पुन्हा खेळाची वैभवशाली परंपरा निर्माण करावी. असेही विचार याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.


        खेळावर प्रेम करणाऱ्या काहीं विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन  आयोजित केल्या होत्या. त्यांनीच आपल्या निजी खर्चाला फाटा देत या स्पर्धेसाठी योग्य परितोषक, चषक, आणि नगदी रक्कमही विजेत्यांना देण्याचे निश्चित केले होते, या टोरनामेंट यशस्वी करण्यासाठी यशवंत वाघमारे, उत्तम कांबळे, टिलू येसूरकर, सुभाष खर्गखराटे, टोगरवर, आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या