💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खड्यात वृक्षारोपण करून महानगर पालिकेचा करण्यात आला निषेध....!


💥परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरात होत असलेल्या विकास कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर💥 

परभणी - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ग्रँड कॉर्नर या रस्त्यावरील एल आय सी समोरील रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी एक भलामोठा खड्डा पडला असून आज दिवसभरात या खड्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. या मुळे परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरात होत असलेल्या विकास कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे याच खाद्यात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करून परभणी शहर महानगर पालिकेचा निषेध करण्यात आला. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

परभणी शहर महानगर पालिका म्हणजे गुत्तेदार पोसण्याचा अड्डा झाला असून कोट्यवधी रुपये खर्च करून झालेले रस्ते इतक्या लवकर कसे खराब होतात या कामाची गुणवत्ता पाहता महानगर पालिका भ्रष्टाचाराचे कुराण बनले आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी या वेळी केला.

आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, मंगेश वाकोडे, धर्मेंद्र तूपसमुद्रे, अरुण कांबळे इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या