💥शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन....!


💥शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करून,पुढील कर्ज मिळावं नाहीतर यापुढे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार💥

✍️फुलचंद भगत

वाशिम :मागील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने  कर्जमाफी ची घोषणा केली. मात्र मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ अजूनही मिळाला नाही. त्यामुळं मानोरा तालुक्यातील शिवसेना आक्रमक झाली असून,शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करून,पुढील कर्ज मिळावं नाहीतर यापुढे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितलय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या