💥माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम....!


💥बाभूळगाव येथे आगमन व विविध विकास कामे व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती💥

 राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर,2021 रोजी सकाळी ८.३० वाजता परभणी येथून औंढा जि. हिंगोली कडे प्रयाण. 9.15 वाजता औंढा नागनाथ येथे आगमन व दर्शन, सकाळी 9.45 वाजता औंढा नागनाथ येथून वसमत कडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता वसमत येथे आगमन व जयप्रकाश  दांडेगावकर यांचे निवासस्थानी  सदिच्छाभेट
सकाळी 10.45 वाजता वसमत येथून बाभूळगाव ता. वसमतकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता बाभूळगाव येथे आगमन व विविध विकास कामे व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती- मतदार संघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर सत्कार समारंभ, शेती क्षेत्रात  व हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांचा सत्कार, नेत्र तपासणी व नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन, दिवाळी निमित्त फराळ वाटप...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या