💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाहतुक आघाडीच्या तालुका प्रमुख पदी रामेश्वर जाधव यांची निवड...!


💥युवा आघाडी उपतालुकाध्यक्ष पदी सय्यद खदीर सय्यद वजीर यांची नियुक्ती💥

परभणी - दि . १४/११/२०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष परभणी जिल्हा जनसंपर्क कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात परभणी तालुक्यातील पाथरा व परिसरातील १०० मुस्लीम कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याच कार्यक्रमात सर्वानुमते प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाहतुक आघाडीच्या परभणी तालुका प्रमुख पदी रामेश्वर देविदासराव जाधव तर आघाडी परभणी उपतालुका प्रमुख पदी सय्यद खदीर सय्यद वजीर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र जिल्हा प्रमुखांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुकाप्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर , मिडिया प्रभारी नकुल होगें,लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कलप्रमुख शाम भोंग,अंकुश खंदारे, अरुण कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या