💥पुर्णेत पै.तानाजी जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांस पत्रकारांसह विविध मान्यवरांचा सन्मान...!


💥शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन व टायगर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन💥


पूर्णा (दि.२ नोव्हेंबर) - येथील जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहात जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स वर्धापणदिन व टायगर ग्रुप महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पै.डॉ.तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांसह रक्तदान शिबिर तसेच सामाजिक प्रशासकीय व कला सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांसह पत्रकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत जनहीतवादी पत्रकारीता करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मानाचे आयोजन काल सोमवार दि.०१ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मा.राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशराव वरपूडकर म्हणाले की सेवा व समर्पित भावनेतून केलेल्या कोणत्याही कार्याचा सन्मान होतच असतो म्हणून समर्पित भावनेतून अखंड काम करत रहावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


     येथील शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन व टायगर ग्रुप महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात सेवाभावाने कार्य करणाऱ्या पोलीस, आरोग्य ,महावितरण, नगरपरिषद, पत्रकारिता या विभागातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच  विविध क्षेत्रातील आठ मान्यवरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोंधळसम्राट राजारामबापू सांस्कृतिक सभागृहात सोमवारी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगौरव सोहळा संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश वरपूडकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम , 


पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड , प्रकाश कांबळे, प्रमोद उर्फ राजू एकलारे ,नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे उपअधीक्षक सरदार रविंदरसिंघ कपूर, नगरसेवक उत्तम खंदारे ,ॲड राजेश भालेराव,रौफ कुरेशी,प्रा.गोविंदराव  कदम अब्दुल वहीद कुरेशी  , तुकाराम साठे ,प्रक्षित सवणेकर ,दयानंद कदम ,बाळू जोगदंड ,निखिल धामणगावे ,संयोजक तथा शहीद उधमसिंह फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश चौधरी , टायगर ग्रूपचे सुनिल जाधव , फाऊंडेशनचे कार्यवाह देवेंद्र राठोड ,माणिकराव सूर्यवंशी ,सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश मुळे ,नायब तहसिलदार  नितेशकुमार बोलोले ,आसेफ पठाण,कुंदन ठाकूर ,हिरामण शिंदे ,सचिन ढगे, ऋषीकेश पावडे , सत्कारमूर्ती  सेवानिवृत्त डीवायएसपी  सुभाष राठोड ,हुजुर साहीब नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सेक्रेटरी सरदार रविंदरसिंघ बुंगई,रेल्वे कामगार नेते कॉ.अशोक कांबळे, प्रतिष्ठित व्यापारी प्रतापसिंग रामचंदानी उपस्थित होते.यावेळी  प्रास्ताविक देवेंद्र राठोड यांनी केले सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले.टायगर ग्रूपचे सुनील जाधव यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या