💥अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण,शिवदिक्षा संस्कार दिपोत्सव व संगीतमय शिवकथाचे आयोजन...!


💥सोहळ्याचा प्रारंभ 27 नोव्हेंबर रोजी होणार तर सांगता 3 डिसेंबर रोजी होणार आहे💥

सोनपेठ - श्री गुरु नंदिकेश्वर मठ संस्थान , सोनपेठ जि.परभणी येथे श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी नंदिकेश्वर शिवयोगी महाराज सोनपेठ कर यांच्या पुण्यतिथी महोत्सव व चरपठ्ठाधिकारी श्री ष.ब्र. 108 श्री गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 19 व्या  पट्टाभिषेक वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण, शिवदिक्षा संस्कार, दिपोत्सव व संगीतमय शिवकथा यांचे आयोजन केले आहे. हा सोहळ्याचा प्रारंभ 27 नोव्हेंबर रोजी होत असुन सांगता 3 डिसेंबर रोजी होणार आहे


या सोहळयास दि.27 रोजी शिवकिर्तनकार ष.ब्र. 108 गुरुवर्य निळकंठ महाराज धारेश्वर, दि.28 रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प. जगन्नाथ क्षिरसागर देवळालीकर,दि29 रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प.धनंजय बुलबुले सामनगावकर,दि.30 रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प. सौ.भाग्यश्री शिवहार ईरकर दाभा , दि.1 डिसेंबर रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प. कु.पुनम बाळासाहेब सावंत दाभा , दि.2 रोजी शिवकिर्तनकार शि.भ.प.दिनानाथ शिंदे महाराज खानापूर  व दि. 3 रोजी  श्री ग्रंथराज परमरहस्य शोभायात्रा व यानंतर शि.भ.प. माणिक अप्पा धुमाळ व समस्त पोपडे परिवार तर्फे महाप्रसाद होईल.

तसेच दि 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 श्री गुरु ष.ब्र. 108 नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 21 पट्टाभिषेक वर्धापन सोहळा व दि 2 डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी 8 ते 10 धर्म लिंगार्यत्मक वीरशैव जंगम परोहित संस्था परभणी यांचे समाधीस रुद्राभिषेक नंतर 10 ते 12 शिवदिक्षा , सायंकाळी 6 वाजता दिपोत्सव आयोजन केले आहे.तरी समस्त समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे नम्र विनंती श्री नंदिकेश्वर भक्त मंडळ व समस्त वीरशैव ग्रामस्थ मंडळ, सोनपेठ यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या