💥त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात पोलीसांचे 'रूट मार्च' 'दंगा काबू' योजनाही पार...!


💥गंभीर परिस्थतीची वाशिम पोलीस दल बारकाईने निरीक्षण करीत आहे💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-अलिकडील काळात त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये वाशिम जिल्हयाच्या शेजारील जिल्हयांमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी जनतेस खालील प्रमाणे आवाहन केले आहे.


            वाशिम जिल्हयात शांतता कायम ठेवण्याकरिता जातीय दृष्टया संवेदनशिल ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बिट मार्शल हे सतत आपापल्या कार्यक्षेत्रात सतर्क पेट्रोलिंग करित आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत मनुष्यबळ लाठी, हेल्मेट, ढाल सह पोलीस स्टेशनला राखीव ठेवण्यात आले आहे. शांतता समिती व समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या सभा आयोजित करून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सायबर सेल हे सतत सोशल माध्यमांवर लक्ष ठेउन आहे. सदर गंभीर परिस्थतीची वाशिम पोलीस दल बारकाईने निरीक्षण करीत आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्हयात कोठेही कायदा व सुव्यवस्थेची किंवा हिंसाचाराची परिस्थिती नाही. 

परंतु जर कोठेही हिंसाचाराची घटना घडत असल्यास त्याविरूध्द तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्यीत 'रूट मार्च' व 'दंगा काबू' योजना आयोजित करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार वाशिम जिल्हयातील वाशिम शहर पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय मधील अधिकारी व अंमलदार यांचे आज दि. १४/११/२०२१ रोजी 'संयुक्त रूट मार्च' व 'दंगा काबू योजना' आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये एस.आर.पी.एफ. १ प्लाटून, आर.सी.पी. चे १ प्लाटून,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.धृवास बावनकर तसेच वाशिम शहर पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातील १८ अधिकारी व २७० अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. 'रूट मार्च' दरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर बागवानपुरा,

वाशिम येथे मुस्लिम समाज बांधवांतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सदर 'रूट मार्च'हा संपूर्ण वाशिम शहरात मुख्य बाजारपेठ, मिश्र वस्ती येथे फिरून जिल्हा किडा संकूल येथे आला.तेथे 'दंगा काबू योजनेचे तसेच आंदोलन, दंगल, जाळपोळ व त्यावर नियंत्रण याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर 'दंगा काबू योजनेमध्ये तणावपुर्ण वातावरण, त्यातून केली जाणारी जाळपोळ,नारेबाजी, यांची पोलीसांना मिळणारी माहिती, पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल होणे, परिस्थिीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथक व अतिरिक्त पोलीस कुमक मागवणे, आंदोलक व नागरिकांशी संवाद साधून त्यांना शांत करणे, प्रसंगी गर्दी पांगवण्यासाठी स्टन सेल ग्रेनेड फोडणे,सौम्य व तीव्र लाठीचार्ज, अश्रुधूराचा वापर करणे, दोषींना ताब्यात घेणे यासह अन्य बाबींची प्रात्यक्षिके करण्यात आली.

त्याचप्रमाणे वाशिम जिल्हयातील १) शिरपूर २) आसेगाव ३) अनसिंग ४) जउळका ५) कारंजा शहर ५) कारंजा ग्रामीण येथे ०३ ठिकाणी ६) धनज ७) मानोरा व ८) रिसोड या ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या असून १) रिसोड २) मालेगाव ३) आसेगाव ४) अनसिंग ५)

कारंजा शहर ६) शिरपूर ७) वाशिम ग्रामीण ८) कारंजा ग्रामीण या पोलीस स्टेशनच्या हद्यीत 'रूट मार्च' घेण्यात आला आहे. तसेच १) अनसिंग २) कारंजा शहर व ३) रिसोड या पोलीस

स्टेशनच्या हद्यीत ‘दंगा काबू योजना' घेण्यात आली आहे.अशा प्रकारे वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या हद्यीत 'शांतता समितीची बैठक' 'रूट मार्च' व 'दंगा काबू योजना' आयोजित करण्यात आल्याने जिल्हयातील पोलीसांची तयारी प्राहून

नागरिकांमध्ये सुरक्षितता व सद्भावना निर्माण होउन जिल्हयात शांतता कायम आहे.वाशिम जिल्हयाच्या आजुबाजूच्या जिल्हयात घडणा-या कायदा व सुव्यवस्था व प्रतिकूल

परिस्थितीची वाशिम जिल्हयामध्ये खबरदारी घेण्याकरिता त्याचप्रमाणे मार्गदर्शन व सुचना देण्याकरिता

पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी दि. १५/११/२०२१ रोजी १२:०० वाजता वाशिम जिल्हयातील सर्व शांतता समिती सदस्यांची बैठक बोलावलेली आहे.वाशिम जिल्हा पोलीस दल हे कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास तोंड देण्यास

पूर्णपणे तयारीत असून सर्वांनी शांतता राखावी असे वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी आवाहन केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या