💥पूर्णा पोलीस स्टेशन कडून जनतेस आवाहन ; नागरिकांनी जागरूक व सुरक्षित राहावे...!


💥पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा💥

  पुर्णा (दि.०२ नोव्हेंबर) - तालुक्यासह शहरातील नागरिकांच्या  सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी जागरूक व सुरक्षित राहावे असे आवाहन केले आहे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने खालील निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. 

➡ महीलांनी दिवाळी सणानिमित्त गर्दीच्या ठिकाणी जातांना वा बाजारात फिरतांना वा बसमधून जढता-उतरतांना आपल्या दागिन्यांना झाकुन घ्यावे व आजूबाजूला कोणी संशयीत महीला फिरतात का याबाबत चौकस रहावे. 

➡ATM व बँकेतुन पैसे काढतांना चोरट्यांचे तुमच्यावर लक्ष असते. शक्यतो जास्त रोख पैसे काढू नये, काढल्यानंतर आपले पैसे सुरक्षित ठेवावे. पैसे कोणी हिसकावुन अथवा बहाना करुन चोरणार नाही याची दक्षता घ्यावी.

➡ आपले वाहन ज्या ठिकाणी पार्किग सुविधा वा सी.सी.टि.व्ही.कँमेरे आहेत त्याच ठिकाणी पार्क करावे तसेच आपले वाहनात वा मोटार सायकलच्या डिक्कीत मौल्यवान वस्तु ठेवुन जावू नये. बँग/पर्स चोरी होण्याची जास्त शक्यता असते.

➡ नागरिकांनी शेत वस्तीवर आपली जनावरे एकटी सोडू नयेत. गोटफार्म वा गायी-म्हशींचा तबेला असणाऱ्यांनी मळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

➡ ज्यांना शक्य आहे त्यांनी घर वा दुकानासमोर रस्ते ५०-१०० फुट दिसतील या पध्दतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत जनेकरून चोरांबद्दलची जास्त माहीती पोलीसांना मिळून चोरी झाल्यास उलगडा होईल.

➡ गावातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच यांनी पुढाकार घेवून ज्या गावात चोऱ्या होतात तेथे ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे तसेच ग्रामसुरक्षेसाठी तरुण मुलांचा एक व्हॉट्स ग्रुप बनवावा. त्यामुळे लहान मोठी काही घटना घडली तर गावाला तात्काळ माहिती मिळेल

➡ नागरिकांनी सणानिमित्त बाहेरगावी जाताना घरातील कपाटात वा तिजोरीत जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये. चोरटे सर्वात आधी कपाटच तोडतात. लॅाकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणे शक्य नसल्यास ते कपाटसोडून घरातील इतर कोणत्याही ठिकाणी ठेवावेत. 

➡ दिवसा अनोळखी व्यक्ती वा फेरीवाले वेगवेगळ्या बहाण्याने तुमच्या कॅालनीत, गावात, गल्लीत किंवा शेत वस्तीवर येवून बंद घरांची, जनावरांची रेकी करून जातात व रात्री चोरी करतात. तेंव्हा असे संशयीत दिसल्यास त्यांची चौकशी करा, त्यांचा मोबाईलमध्ये फोटो काढा. त्याचे नाव पोलीस पाटील यांचे कडील मुशाफिरी रजिस्टर मध्ये वा संबंधीत पोलीस स्टेशनला नोंदले आहे काय याची खात्री करा. अशा संशयीतांची माहीती पोलीसांना तात्काळ द्या.

➡ कोणताही आर्थिक व्यवहार किंवा ईतर खरेदी -विक्री मधून मिळालेले  रोख पैसे घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करा.

➡ तुमचे दागीने पॅालीश करून देतो. अर्ध्या किमतीत गुप्तधनाचे सोने देतो अशा भुलथापांपासुन सावध रहा

➡️ तुमच्या मोबाईलवर लॅाटरी लागली, बक्षीस मिळाले, लकीड्रॅा वा काहीतरी जिंकल्याचे मॅसेज येतात अशा लिंकवर क्लीक करू नका, तसेच व्हॅाट्सॲप फेसबुक इन्टावर अनोळखी व्यक्ती किंवा महीला चॅटींग करून नंतर तुम्हाला व्हीडीओ कॅाल करून गैरकृत्य करण्यास सांगू शकतात. तसेच नंतर तुम्हाला गैर कृत्याची रेकॅार्डींग व्हायरल करू असे सांगू पैसे मागू शकतात. यापासून सावध रहा

➡️ तुम्हाला अनेकवेळा फोन करून बॅंकेतून बोलतो, आधारकार्ड, एटीएम नंबर, ओटीपी नंबर ईत्यादीची मागणी केली जाते अशा फोनला कोणताही प्रतिसाद देवू नका,फसवणुकीपासून वाचा

 

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या