💥'भाऊबीज' निमित्त निराधार विधवा ताईंना उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणी/डाळ काढायची मशीन....!


💥होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेचा उपक्रम💥  

 परभणी (दि.06 नोव्हेंबर) - भाऊबीज निमित्त होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे निराधार व दुर्धर आजारग्रस्त ताईला उदरनिर्वाहासाठी 2 in 1  पिठाची गिरणी/डाळ काढायची मशीन देऊन ओवाळणी अर्पण करण्यात आली.  

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था मागील 12 वर्षा पासून एचआयव्ही संक्रमित बालके, निराधार विधवा महिला व अनाथांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी नियमितपणे प्रयत्न करते. तसेच एचएआरसी संस्थे तर्फे आजवर  महाराष्ट्रातील अनेक विशेष बालगृहातील एचआयव्ही ग्रस्तांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन साठी वेळोवेळी मदत  केली जात आहे. 

 एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना शासनाकडून मोफत औषधोपचार दिला जातो. परंतु एचआयव्ही एड्स मुळे आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांचा विशेषतः 18 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांचा स्वयंरोजगार व प्रशिक्षण चा प्रश्न बिकट आहे. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या एड्सग्रस्त महिलांचा उदरनिर्वाचा प्रश्न बिकट आहे. अशा प्रसंगी त्यांना स्वावलंबी बनवून स्वयंरोजगार व प्रशिक्षण द्वारे मदत देणे गरजेचे आहे.  यात एचएआरसी संस्थे तर्फे  आजवर 29 ज्यात 3 संस्थात्मक व 26 वैयक्तिक पातळीवर गरजू निराधार ताईंना एचएआरसी तर्फे शिलाई मशीन व पिको फॉल मशीन व  2 विधवा ताईला डाळ काढायची गिरणी दिली आहे हेच कार्य करतांना आज भाऊबीजचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम 'एचएआरसी संचलित स्वाध्यायशक्ती अभ्यासिका' येथे आयोजित करण्यात आला होता. 

पूर्णा तालुक्यातील एका ग्रामीण भागातील  या महिलेच्या पतीचा एचआयव्ही एड्स मुळे मृत्यू झाल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. शासनाकडून तिला मोफत औषधोपचार मिळतो. पण तिला उदरनिर्वाहासाठी मदतीची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात डाळ काढायचा व्यवसाय चालतो. म्हणून तिला आपण 2 in 1 डाळ काढायची/पीठ तसेच मसाला काढायची आदी सर्व सुविधा उपलब्ध असलेली 16,000/- किंमतीची मशीन देत आहोत. 

या प्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी  एचआयव्ही व अनाथांसाठी एचएआरसी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना म्हणाले "समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षण साठी जी पण भविष्यात मदत लागेल ती एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल.सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे". 

या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा शिवा आयथळ, अंजली जोशी, राजेश्वर वासलवार, विशाखा हेलसकर, नीरज पारीक, राजकुमार भगत, सत्यंजय हर्षे, योगेश पाटील यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या