💥रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या दोघा राज्य समन्वयकांना तातडीने अटक करा - आ.सुरेशराव वरपूडकर


💥जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम वितरित करावी💥

परभणी (दि.२२ नोव्हेंबर) - रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या दोघा राज्य समन्वयकांना तातडीने अटक करावी व जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वितरित करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर व ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश दादा देशमुख यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आँचल गोयल यांची काँग्रेसच्या या दोन बड्या नेतेमंडळींनी एका शिष्टमंडळासह सोमवारी दुपारी भेट घेतली, या भेटीतून एक तपशीलवार निवेदन सादर केले त्याद्वारे जिल्‍हाधिकारी श्रीमती गोयल यांचे रिलायन्सच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.ज्येष्ठ नेते माजी आमदार देशमुख यांनी यावेळी बोलताना रिलायन्सच्या दोघा समन्वयकांना अटक केल्याशिवाय या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित होणार नाही हे नमूद केले.जिल्ह्यातील खरीप पिकांच्या विम्याच्या रकमेच्या संदर्भात जिल्हा महसूल प्रशासनाने वारंवार बोलावलेल्या बैठकांना गैरहजेरी दाखवली. तसेच पीक विम्या वितरणासंदर्भात निष्काळजीपणा दाखवला.


यावेळी देशमुख यांनी यावेळी बोलतांना या कंपनीकडे जिल्ह्यात खरीप हंगाम, रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. 52 महसूल मंडळात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर तीन लाख 24 हजार 356 शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केली. या नुकसानीचे पंचनामे पूर्व सूचना प्राप्त झाल्यानंतर आपणही दहा दिवसात करण्याचे आदेश दिले होते. परंतु या कंपनीने अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण दाखवून गेल्या एक महिन्यापासून हे पंचनामे केले नाहीत याकडे लक्ष वेधले. विशेषतः आपणही बोलावलेल्या बैठकांना सुद्धा हे अधिकारी हजर राहिले नाहीत. दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वर्ग करावी असे अपेक्षित होते परंतु त्यासंदर्भात या कंपनीने दुर्लक्ष केले .त्यामुळे जिल्हाधिकारी या नात्याने आपण आता या कंपनीविरोधात कठोर भूमिका घेऊन जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी असे देशमुख यांनी यावेळी नमूद केले.यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी आपण या कंपनीच्या विरोधात कृषी विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत, वारंवार संपर्क साधून पाठपुरावा सुद्धा सुरू केला आहे, अशी माहिती दिली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सद्यस्थितीत आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या।यावेळी माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड उपमहापौर भगवान वाघमारे स्थायी समितीचे सभापती बुल अमीर खान विनोद कदम जलील पटेल शुभम जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या