💥सैन्यदलात भरती झालेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या जिजाऊ कन्येचा क्षत्रिय फाउंडेशन कडून गौरव व सत्कार...!


💥आसाम रायफल,इंडियन आर्मी मध्ये राखी साळवे हिचा समावेश💥 

चिखली--भारत  सरकारने सैन्यदलात महिलांनाही समावेश करून घेण्याच्या निर्णयानंतर  महिला सैन्यदलात भरती झालेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या जिजाऊ कन्या राखी  माणिकराव सावळे हिचा चिखली येथे छत्रिय फाउंडेशन च्या वतीने गौरव व सत्कार करण्यात आला

         भारतीय सैन्य दलामध्ये महिलांचा  समावेश करून घेण्याच्या निर्णयानंतर झालेल्या महिला सैन्याच्या 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील पाच मुलींचा समावेश झाला होता मात्र कोरोना काळामध्ये पुढील प्रक्रिया थांबली होती नंतर मार्च २०२१ मध्ये नागालँड मधून घरी कॉल आल्यानंतर सात महिने बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाले असून आसाम रायफल, इंडियन आर्मी मध्ये राखी साळवे  हिचा समावेश झाला आहे आर्मी मध्ये भरती होणारी राखी माणिकराव साळवे रा. पिंपरी आंधळे ही मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातील पहिली युवती असल्याने आज १९नोव्हेबर  झाशीच्या राणी लक्ष्मीबाई तसेच देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून चिखली येथील क्षत्रिय फाउंडेशन च्या वतीने डॉक्टर अजाबराव वसू यांच्या  निवास्थानी या सैन्य दलातील पहिल्या युवतीचा सत्कार व गौरव यावेळी करण्यात आला. प्रसंगी सत्काराला उत्तर देताना राखी साळवे  हिने देशासाठी सेवा देण्याचा मला बहुमान मिळाल्याचा गर्व आहे तसेच आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद मला गगनात मावेनासा आहे मला सैन्यदलाच्या युनिफॉर्म मध्ये पाहून माझ्या वडिलांच्या डोळ्यातील आनंद आश्रू बघून मला खूप गहिवरून आले होते अशा भावना तिने यावेळी व्यक्त करीत ग्रामीण भागातील मुलींनी परिस्थितीला खचून न जाता ध्येय प्रति प्रामाणिक राहिल्यास यश निश्चित मिळते अशा भावना व्यक्त करीत आपल्यावरील परिस्थिती आणि संकटाचा मी कधीही भावू  केला नाही किंवा हार मानली नाही असा आपल्या यशाचा मंत्र तिने यावेळी दिला.

यावेळी डॉ सत्येंद्र भुसारी यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या तसेच  इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनी राखी साळवे हिचा होत असलेला सन्मान हा खरोखर गौरवास्पद आहे डॉ. वसू यांनी परिस्थितीला सामोरे जाऊन कसे यश मिळवायचे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर राखी आहे असे गौरवोद्गार काढून तिच्या ध्येयाला सलाम ठोकला. रामभाऊ जाधव, गोपाळराव जाधव ,पत्रकार समाधान गाडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राखी साळवे हिचा सैन्य दलामध्ये झालेला समावेश हा राजमाता, राष्ट्रमाता ,जिजाऊ माँसाहेबांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासाठी खरोखर गौरवाची व अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली

 या सत्कारप्रसंगी डॉक्टर अजाबराव वसू,त्यांच्या अर्धांगिनी सौ. मंजुषा अजाबराव वस्तू माजी सभापती डॉक्टर सत्येंद्र भुसारी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ,डॉक्टर प्रभू इंगळे, सौ वंदना प्रभु इंगळे ,कुमारी रिद्धी वसु ,हरिभाऊ परिहार ,  माजी पंचायत समिती उपसभापती बिदुसिंग इंगळे, पत्रकार समाधान गाडेकर ,अडवोकेट संजीव सदार ,राम सुरडकर, नंदकिशोर हाडे, समाधान सोळंकी , शिवम ड्रायविंग स्कूलचे सोळंकी, डॉक्टर रवि पवार , गोपाळराव जाधव ,रूपाली शेगोकार ,सुरज साळवे, विश्वनाथ सोळंकी यांच्यासह   क्षत्रिय  फाउंडेशन चिखलीचे स्वयंसेवक उपस्थित होते.

 वडील पिंपरी आंधळे येथे शेती शेतमजुरी करतात व आपल्या बहिण भावासह राखीने चिखलीत राहून पार्ट टाइम जॉब करत  शिक्षण घेतले सैन्य दलातील तयारी केली  असे  राखी साळवे हिचे मनोगत ऐकून भारावलेल्या वसू परिवाराने राखी साळवेला  रोख स्वरूपात बक्षिसही दिले व तिच्या जिद्दीला व परिश्रमाला दाद दिली.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या