💥पुर्णेचे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आंतरराष्ट्रीय त्रि रत्न पुरस्काराने सन्मानित.....!


💥पुज्यनिय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्रिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला💥

पूर्णा (दि.23 नोव्हेंबर) - भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे धम्म चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल लेह लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय य् विपश्यना केंद्र चे प्रमुख भंते संघ सेन  महाथेरोयांच्या हस्ते अखिल भारतीय 16 वि बौद्ध धम्म परिषद धम्म चल अजंठा लेणी येथे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्रिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.


भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धम्म संस्कार केंद्रे निर्माण केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनातून उच्चशिक्षित तरुण भिक्कू संघ निर्माण झाला. भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी उच्चशिक्षित तरुण भिकू यांना श्रीलंका थायलँड या बौद्ध देशांमध्ये पाठवून धम्माचे प्रशिक्षण दिले अजंठा लेणी परिसरामध्ये धम्म चल संस्कार केंद्राची स्थापना करून 74 एक्कर जमिन खरेदी केली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे धम्म संस्कार केंद्र पाली विद्यापीठ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे दक्षिण कोरिया येथील भिककु संघाने धम्म परिषदेच्या निमित्ताने भेट दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा नांदेड येथील दाभाड लातूर येथील सात करणी, बीड जिल्ह्यातील भदंत आनंद कौसल्यायन धम्म संस्कार केंद्र परभणी जिल्ह्यातील अम्रवन व इतर अनेक ठिकाणी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार व धम्म संस्कार केंद्रे चालविली जात आहेत भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो दर वर्षी बौद्ध धर्मीय देशाला धम्म सहल आयोजित करत असतात. तसेच देशांमधील बौद्ध धम्म स्थळाचं धम्म सहल आयोजित करत असतात. गेल्या चार दशकापासून अखंडितपणे त्यांचं हे कार्य सुरू आहे ते उच्चविद्याविभूषित असून एम ए पाली नेट व सेट त्याच प्रमाणे पीएचडी आहेत अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

लेह लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राचे प्रमुख भंते संघसेन महा थेरोयांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुमोलाचा त्यांना त्रिरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल    सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे, नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड. धम्मदिप जोंधळे, दादाराव पंडित, मुकुंद भोळे, मधुकर गायकवाड, वीरेश कसबे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे उपाध्यक्ष गौतम वाघमारे रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे ज्येष्ठ धम्म उपासक अमृतराव मोरे, वा.रा. काळे गुरुजी टी झेड कांबळे पत्रकार विजय  बगाटे दिलीप गायकवाड पीजी रणवीर शामराव जोगदंड एम यु खंदारे, ज्ञानोबा जोंधळे, किशोर ढाक रगे, अतुल गवळी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे उमेश बराटे अमृत कऱ्हाळे बाबाराव वाघमारे मुंजाजी गायकवाड आदींनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या